रत्नागिरीत पंधरा केंद्रांवर सतरा हजार क्विंटल भात खरेदी 

रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १,५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आले. जिल्ह्यातील १५ केंद्रावर भात खरेदी सुरू असून, प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये दर दिला आहे.
रत्नागिरीत पंधरा केंद्रांवर  सतरा हजार क्विंटल भात खरेदी At fifteen centers in Ratnagiri Buy seventeen thousand quintals of rice
रत्नागिरीत पंधरा केंद्रांवर  सतरा हजार क्विंटल भात खरेदी At fifteen centers in Ratnagiri Buy seventeen thousand quintals of rice

रत्नागिरी : रत्नागिरी मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १,५३० शेतकऱ्यांकडून १७ हजार ७८५.४५ क्विंटल भात खरेदी करण्यात आले. जिल्ह्यातील १५ केंद्रावर भात खरेदी सुरू असून, प्रति क्विंटल १ हजार ८६८ रुपये दर दिला आहे.  मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतकऱ्यांकडून शासन ठरवून देईल, त्या दराने शेतमालाची खरेदी करून पुरवठा समितीकडे वितरित करण्यात येते.

जिल्ह्यात या योजनेसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती. यासाठी शासनाने १३१० रुपये दर दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील १९५९ शेतकऱ्यांनी आपल्याकडील भाताची विक्री केली होती.

भात गोडावूनमध्ये शिल्लक राहिल्याने पुढील दोन वर्षे भाताची खरेदीच झाली नव्हती. जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटी यांच्यातर्फे धान्याची खरेदी केली जाते. मार्केटिंग फेडरेशनने या वर्षी २२ हजार क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ४ हजार २१४.५५ क्विंटल भात खरेदीची गरज असून, ३१ मार्च पर्यंत पूर्तता होण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया... यंदा भात खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. भात खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जात आहेत. वहाळ वगळता अन्य सर्व केंद्रावर चांगला प्रतिसाद लाभला आहे.  - पी. जे. चिले, मार्केटिंग फेडरेशन 

केंद्र शेतकरी धान्य (क्विंटल) 

  •  खेड १९० ३९६४ 
  •  दापोली ६४ ६०६ 
  •  केळशी १९८ १११४.८० 
  •  गुहागर १८७ १२१७.६० 
  •  रत्नागिरी १५३ १२७२.४० 
  •  संगमेश्वर ११९ १६००.४० 
  •  लांजा २२ १३३.६० 
  •  राजापूर ४६ ४९५.०५ 
  •  पाचल ३६ ४७०.६० 
  •  चिपळूण १५६ २५४८.४० 
  •  मिरवण १०४ १६६७.२० 
  •  आकले ४० ४३९.२० 
  •  शिरगाव १७८ १६४८.८० 
  •  शिरळ ४१ ६०८.४० 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com