Agriculture news in marathi Fifteen quintals of chillies in Parbhani market | Agrowon

परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २०) ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली होती. ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २०) ढोबळी मिरचीची १५ क्विंटल आवक झाली होती. ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी दोन हजार रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन ३ हजार ५०० ते पाच हजार रुपये तर सरासरी ४ हजार २५० रुपये दर मिळाला. गवारीची ३०  क्विंटल आवक होऊन दोन हजार ते तीन हजार रुपये, तर सरासरी २ हजार ५०० रुपये दर मिळाला. चवळीची ७ क्विंटल आवक असताना दोन हजार ते तीन हजार रुपये तर सरासरी २ हजार ५०० रुपये दर मिळाला. वालाची ७ क्विंटल आवक होऊन २ हजार ५०० ते चार हजार रुपये तर सरासरी ३ हजार २५० रुपये दर मिळाला.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २५ क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार रुपये तर सरासरी २ हजार २५० रुपये दर मिळाला. कारल्याची ३० क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी २ हजार रुपये दर मिळाला. काकडीची ७० क्विंटल आवक होऊन ६०० ते हजार रुपये तर सरासरी ८०० रुपये दर मिळाला. दुधी भोपळ्याची २५  क्विंटलला आवक होऊन ६०० ते १ हजार २०० रुपये दर तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. 

पेरूला सरासरी ६०० रुपयांचा दर
पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक होऊन ५०० ते हजार रुपये तर सरासरी ७५० रुपये दर मिळाले. शेपूची ३० क्विंटल आवक होऊन ५०० ते हजार रुपये तर, सरासरी ७५०  रुपये दर मिळाला. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन ८०० ते  १ हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार १५० रुपये दर मिळाला. मेथीच्या ४०  हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा प्रतिशेकडा २०० ते ४०० तर सरासरी ३०० रुपये दर मिळाला.

कोथिंबिरीची २०० क्विंटल आवक होऊन ५०० ते हजार रुपये तर सरासरी ७५० रुपये दर मिळाला. टोमॅटोची ३ हजार क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला २०० ते ३०० रुपये तर सरासरी २५० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन २ हजार ५०० ते ४ हजार रुपये तर सरासरी ३ हजार २५०  रुपये दर मिळाला. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये तर सरासरी २ हजार रुपये दर मिळाला. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन ८००  ते १ हजार ३०० रुपये तर सरासरी १ हजार ५० रुपये दर मिळाला. कोबीची ५० क्विंटल आवक होऊन हजार ते १ हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार २५० रुपये दर मिळाला.

बीटरूटची ७ क्विंटल आवक होऊन १ हजार २००  ते २ हजार रुपये तर सरासरी १ हजार १०० रुपये दर मिळाला. पातीच्या कांद्यांची १०  क्विंटल आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार रुपये तर सरासरी १ हजार ७५० रुपये दर मिळाला. लिंबाची ५० क्विंटल आवक होऊन ४०० ते ८०० रुपये तर सरासरी ६०० रुपये दर मिळाला. आवळ्याची २५ क्विंटल आवक होऊन ६०० ते १ हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार ५० रुपये दर मिळाले. पेरूची ३०० क्विंटल आवक होऊन ५०० ते ७०० रुपये तर सरासरी ६०० रुपये दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...