खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची पेरणी

जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि पावसाच्या खंडामुळे पिके मोडावी लागल्याने पेरण्या उशिरा कराव्या लागत आहेत. बाजरीची पेरणी नंदुरबार, धुळे, जळगावात वाढली आहे.
 Fifteen thousand hectares of millet sown in Khandesh
Fifteen thousand hectares of millet sown in Khandesh

जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि पावसाच्या खंडामुळे पिके मोडावी लागल्याने पेरण्या उशिरा कराव्या लागत आहेत. बाजरीची पेरणी नंदुरबार, धुळे, जळगावात वाढली आहे. 

बाजरीचे खरिपातील क्षेत्र खानदेशात १० ते १२ हजार हेक्टरपर्यंत असते. मका, ज्वारी पीक अधिक असते. पण यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. तर बाजरीचे क्षेत्र वाढले आहे. बाजरी पेरणी सुरूच आहे. नंदुरबार, धुळ्यात बाजरीची पेरणी अधिक आहे.

धुळ्यातील साक्री, शिंदखेडा व नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, तळोदा भागात बाजरी पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र स्थिर आहे. सुमारे १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी आणखी होत आहे. क्षेत्र यंदा वाढेल. नेमके आकडे पुढील तीन दिवसांत येतील, अशी माहिती आहे. तुरीसह बाजरीची पेरणी नंदुरबारात सुरू आहे. सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग ही पिके पेरणीची मुदत संपत आल्याने शेतकरी बाजरीकडे वळले आहेत.

चारा व धान्य, या उद्देशातून बाजरी पेरणी झाली आहे. कोरडवाहू शेतीधारक शेतकऱ्यांसमोर सध्या तूर व बाजरीचाच पर्याय आहे. यात बाजरीला अनेक शेतकरी पसंती देत असल्याचे सांगण्यात आले. कमी पावसात व कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची शेतकरी पेरणीला निवड करीत आहेत. 

ऑगस्टअखेर अंतिम अहवाल 

बाजरीची पेरणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातदेखील होईल. यामुळे पेरणीबाबतचा अंतिम अहवाल ऑगस्टअखेरीच जाहीर होईल. खानदेशात शिंदखेडा, साक्री, जळगावमधील चाळीसगाव, भडगाव परिसर बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात पेरणीदेखील होत आहे. पण यंदा नंदुरबारात पेरणी वाढत आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com