Agriculture news in marathi Fifty percent average turnout for Gram Panchayats in Vidarbha | Agrowon

विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान झाले. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नक्षलप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवास मिळाला.

नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास टक्के मतदान झाले. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नक्षलप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांचा ग्रामपंचायत निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवास मिळाला. सायंकाळपर्यंत ८० टक्के मतदानाची नोंद येथे झाली. ३२० पैकी १७० ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. 

गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत नक्षलवाद्यांची दहशत राहते. त्यामुळे बारा तालुक्यांपैकी पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये मतदान घेण्यात आले. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कुरखेडा, धानोरा या सहा तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते.

उर्वरित सहा तालुक्यांमध्ये २० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. पोलिसांनी निवडणूक प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणतेही नक्षलवादी कृत्य घडले नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया प्रभावित झाली होती. त्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. ९२५ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात मतदान झाले. सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७२ वर पोहोचवली होती.

महागाव तालुक्यातील सवना येथे उमेदवाराला दारू वाटप करताना पकडण्यात आले. या प्रकरणी महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडेगाव येथे पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी असलेला दारूसाठा जप्त केला. या घटना अपवाद वगळता यवतमाळ जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.

भंडारा जिल्ह्यात १४८ ग्रामपंचायत करता मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळपर्यंत ही टक्केवारी ७९ वर पोहोचवली होती. चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ पैकी २० ग्रामपंचायती अविरोध झाल्या. त्यामुळे ६०९ ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी दीड वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले होते. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ५३५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

दुपारी दीड वाजेपर्यंत ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. सायंकाळ पर्यंत हा आकडा टक्के ७८ टक्के गेला होता. विदर्भातील सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदारांचे तापमान नोंदवून त्यानंतरच केंद्रात सोडण्यात येत होते. त्या सोबतच काही मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथकांची नेमणूक देखील करण्यात आली होती.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा १०८ हेक्टरवरील...पुणे : पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड...
खानदेशात कांदा काढणी लवकरच सुरू होणार जळगाव : खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार...
सातबारा, आठ ‘अ’च्या अधिकारासह पंतप्रधान...नाशिक : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध...
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सातारा...सातारा : जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी...
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी ...मुंबई : ‘‘मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या...सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव...
महावितरणचे राज्यात आता 'कृषी ऊर्जा...सोलापूर ः राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-...
...त्यानंतर वैधानिक मंडळे घोषित करू : ...मुंबई : ‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा...
मानोलीत रब्‍बी ज्‍वारीची पीक प्रात्‍...परभणी ः ‘‘आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीस पोषणाच्‍या...
शेळ्या-मेंढ्यांना आधुनिक औषधोपचाराची...अकोला ः भारतातील बहुसंख्य अल्पभूधारक व भूमिहीन...
रानवाडी प्रकल्पाचा वनवास केव्हा संपणार?जलालखेडा, जि. नागपूर : नरखेड तालुक्यामधील पंचायत...
उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे...नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा...
भातगाव येथे आंबा, काजूची बाग होरपळलीगुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील भातगाव येथे...
‘रोहयो’तून डाळिंब लागवडीच्या...आटपाडी, जि. सांगली ः आटपाडी तालुक्‍यात तालुका...
ताकारी योजनेच्या दुसऱ्या वितरिकेची...देवराष्ट्रे, जि. सांगली ः ताकारी योजनेच्या...
नगरला शेवगा, वांग्यांचे दर टिकून;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
शाश्वत शेतीसाठी रेशीम उद्योग उपयुक्त ः...जालना  : ‘‘मराठवाड्यातील शाश्वत शेतीसाठी...
औषधी वनस्पतींनी वाढवा प्रतिकारशक्तीभारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे....
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आठवडी बाजार बंदचा भाजीपाला उत्पादकांना...जळगाव : खानदेशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहत...