नगर जिल्ह्यातील ९४ छावण्यांत ५७ हजार जनावरे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनावरांच्या छावण्या पाऊस पडत नसल्याने बंद करताच आल्या नाहीत. सध्या छावण्यांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही जिल्ह्यामध्ये ९४ छावण्या सुरू असून त्यात ५७ हजार ८६१ जनावरे आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिना अखेर छावण्या बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, अजूनही पाऊस नाही त्यामुळे छावण्या बंद झाल्यास पुन्हा जनावरे जगविण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यांमधील एखाद्या गावाचा अपवाद वगळता जिल्हाभरातील जवळपास सगळ्याच गावांनी गेल्या वर्षभरात आत्तापर्यंतचा गंभीर दुष्काळ अनुभवला आहे. अजूनही पाऊस झाला नाही. सप्टेंबरनंतर तर थेंबभर ही पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षी खरीप आला नाही आणि रब्बीला मोठा फटका बसला. यंदाही सप्टेंबर उजाडत आहे. अजूनही पाऊस नाही खरिपातील बहुतांशी पिके धोक्यात आहेत. मात्र, आता परतीच्या पावसावर मदार आहे. गतवर्षी दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी प्रशासनाने छावण्या सुरू केल्या. जूनपर्यंत हा आकडा ५०५ पर्यंत गेला होता त्यानंतर झालेल्या पावसावर भरोसा ठेवून काही छावण्या बंद झाल्या मात्र जिल्ह्यांमधील बहुतांशी भागात अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे अजूनही जनावरे जगविण्याची चिंता कायम आहे.

सध्या जिल्हाभरातील सर्वाधिक कर्जत तालुक्यात ३६ पाथर्डी तालुक्यात ३०, जामखेडला पाच व शेवगावला तेवीस अशा ९४ छावण्या सुरू आहेत. त्यात ५१, ८१२ मोठी तर ६०४९ लहान जनावरे आहेत. नगर तालुक्यात छावण्या सुरू करण्याची मागणी अजूनही सुरूच आहे.   जनावरांना पशुवैद्यक लाभ दिलेले जनावरे

  • विविध उपचार  -  ६२ हजार 
  • कृत्रिम रेतन - ४५ हजार ४२९
  •  गर्भधारणा तपासणी  - ३८ हजार २४७
  •  शस्त्रक्रिया  -  २ हजार ९९४
  •  लसीकरण  -  ४ लाख ९६ हजार ०५१
  •  गोचीड निर्मूलन  -  २९ हजार ८०८
  •  जंत निर्मूलन  -  २६ हजार ८८५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com