नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
बातम्या
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः चव्हाण
नांदेड : ‘‘जिल्ह्यात सध्या दोन हजार ७५५ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली. या निधीतून तब्बल १८० कामे होणार आहे’’, अशी माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास कामांसाठी फारसा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु, आता मराठवाड्यात आणि नांदेडमध्ये विकासाची गंगा वाहण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात सध्या दोन हजार ७५५ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली. या निधीतून तब्बल १८० कामे होणार आहे’’, अशी माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
सांगवी येथील आसना नदीच्या जुन्या पुलाची दुरुस्ती व रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते शुक्रवारी (ता.२२) बोलत होते. आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील-कोकाटे आदी उपस्थित होते.
मराठवाड्याच्या विकासासाठी मागील पाच वर्षात निधी मिळाला नाही. भाजपच्या सरकारने मराठवाड्याची उपेक्षा केली. मात्र ही उणीव महाविकास आघाडीचे सरकार भरून काढेल. मध्यंतरी कोरोना संसर्ग आणि त्यानंतर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकास कामात अडचणी आल्या. परंतु त्यांना गती देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास चव्हाण यांनी दिला.
३० कोटींचा उड्डाण पूल
नांदेड शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी आसना नदीवर आणखी एक नवीन पूल निर्माण करण्यासह बाफना ते सूत गिरणीपर्यंत ३० कोटी रुपयांच्या निधीतून उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
याशिवाय तरोडा ते महादेव पिंपळगाव या रस्त्यावर ११ कोटीच्या निधीतून पूल उभारला जाईल. आणखी चार हजार कोटी रुपयांतून विकास कामे करण्यात येतील. नांदेड शहरात ५०० कोटी रुपयांची विविध विकास कामे नव्याने हाती घेण्यात येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
- 1 of 1548
- ››