agriculture news in Marathi fight over vegetable and fruit selling Maharashtra | Agrowon

भाजीपाला, फळविक्रीवरून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांमध्ये भररस्त्यात जुंपली 

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

परजिल्ह्यातील भाजीपाला आणि फळविक्रीस मनाई केली असतानाही सुरू असलेल्या विक्रेत्यावर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कारवाईस सुरूवात केली.

सिंधुदुर्ग: परजिल्ह्यातील भाजीपाला आणि फळविक्रीस मनाई केली असतानाही सुरू असलेल्या विक्रेत्यावर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कारवाईस सुरूवात केली. ही कारवाई सुरू असतानाच उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आक्षेप घेतला. या विषयावरून त्यांच्यामध्ये भररस्त्यातच चांगलीच जुपंली. 

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी विक्रेत्यांवर कारवाई न केल्यामुळे नगराध्यक्षांनी मुख्यधिकाऱ्यांची तक्रार पालकमंत्र्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले. 

परजिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळुन येत असल्यामुळे पालिकेने परजिल्ह्यातील भाजीपाला आणि फळविक्री करू नये, असा निर्णय घेतला होता. तरीदेखील गाड्या लावुन भाजी आणि फळे विक्री करताना काही विक्रेते दिसुन आले. त्यामुळे नगराध्यक्ष श्री. कादंळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली. ही माहीती उपनगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्षांना समजताच ते कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी आले. त्यांनी कारवाईस आक्षेप घेतला. या विषयावरून त्यांच्यामध्ये रस्त्यावरच जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. नगराध्यक्षांनी नियमानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगीतले. 

तर उपनगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांची परवानगीनेच भाजी आणि फळविक्री सुरू आहे. त्यामुळे कुणीही हुकुमशाहीने विक्री बंद करू नये असे स्पष्ट केले. त्यामुळे तेथील वातावरण चांगलेच तापले. भररस्त्यातच हा वाद झाल्यामुळे बघ्यानीही तेथे गर्दी केली. नगराध्यक्ष निघून गेल्यानतंर भाजी व फळविक्री सुरू होती. 

दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी विक्रेत्यावर कारवाई न केल्यास त्यांच्यावर कारवाईची मागणी आपण पालकमंत्री उदय सांमत यांच्याकडे करणार असल्याचे नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...