Agriculture news in marathi fight in Pandharpur Assembly by-election | Agrowon

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. 

सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. पण गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी काठीचा धाकही दाखवावा लागला. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सातला मतदान सुरू झाले. आज उन्हाची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू होते. पण दुपारी दोननंतर काहीसा वेग आला. 

या निवडणुकीसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही तालुक्यांत ५२४ इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रांवर स्वच्छता साहित्य ठेवण्यात आले होते. पोलिसही अधिकची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष ठेवून होते. ती हटवण्याचे प्रयत्न सातत्याने होत होते. काही ठिकाणी थेट काठीचा धाकही पोलिसांना दाखवावा लागला. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी १ लाख १२ हजार ८९३ मतदारांनी मतदान केले. याआधीच ३ हजार २२९ इतके टपाली मतदानही झाले आहे. दुपार चारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. 

दोन मे रोजी निकाल 
महाविकास आघाडीकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. त्याशिवाय अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्‍वर आवताडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटीलही मैदानात आहेत. याशिवाय अन्य १४ असे १९ जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात रंगत आणली होती. कोरोना परिस्थिती असतानाही प्रचारसभांना झालेली गर्दी आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचार चांगलाच गाजला. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी येत्या २ मे रोजी होणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...