Agriculture news in marathi fight in Pandharpur Assembly by-election | Page 3 ||| Agrowon

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. 

सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. पण गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी काठीचा धाकही दाखवावा लागला. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सातला मतदान सुरू झाले. आज उन्हाची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू होते. पण दुपारी दोननंतर काहीसा वेग आला. 

या निवडणुकीसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही तालुक्यांत ५२४ इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रांवर स्वच्छता साहित्य ठेवण्यात आले होते. पोलिसही अधिकची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष ठेवून होते. ती हटवण्याचे प्रयत्न सातत्याने होत होते. काही ठिकाणी थेट काठीचा धाकही पोलिसांना दाखवावा लागला. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी १ लाख १२ हजार ८९३ मतदारांनी मतदान केले. याआधीच ३ हजार २२९ इतके टपाली मतदानही झाले आहे. दुपार चारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. 

दोन मे रोजी निकाल 
महाविकास आघाडीकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. त्याशिवाय अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्‍वर आवताडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटीलही मैदानात आहेत. याशिवाय अन्य १४ असे १९ जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात रंगत आणली होती. कोरोना परिस्थिती असतानाही प्रचारसभांना झालेली गर्दी आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचार चांगलाच गाजला. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी येत्या २ मे रोजी होणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...