Agriculture news in marathi fight in Pandharpur Assembly by-election | Agrowon

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. 

सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान काहीसे संथ झाले. पण दुपारच्या सत्रात मतदानाने वेग घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. पण गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी काठीचा धाकही दाखवावा लागला. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सातला मतदान सुरू झाले. आज उन्हाची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मतदान संथ गतीने सुरू होते. पण दुपारी दोननंतर काहीसा वेग आला. 

या निवडणुकीसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही तालुक्यांत ५२४ इतकी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रांवर स्वच्छता साहित्य ठेवण्यात आले होते. पोलिसही अधिकची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष ठेवून होते. ती हटवण्याचे प्रयत्न सातत्याने होत होते. काही ठिकाणी थेट काठीचा धाकही पोलिसांना दाखवावा लागला. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी १ लाख १२ हजार ८९३ मतदारांनी मतदान केले. याआधीच ३ हजार २२९ इतके टपाली मतदानही झाले आहे. दुपार चारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.८१ टक्के इतके मतदान झाले. 

दोन मे रोजी निकाल 
महाविकास आघाडीकडून भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान आवताडे हे रिंगणात आहेत. त्याशिवाय अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्‍वर आवताडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटीलही मैदानात आहेत. याशिवाय अन्य १४ असे १९ जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात रंगत आणली होती. कोरोना परिस्थिती असतानाही प्रचारसभांना झालेली गर्दी आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने प्रचार चांगलाच गाजला. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी येत्या २ मे रोजी होणार आहे. 
 


इतर बातम्या
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
औरंगाबाद जिल्ह्यात पावणेसात लाख...औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ८१...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
खतांच्या किमती कमी करून केंद्राने...बारामती, जि. पुणे : केंद्र सरकारने खताच्या...
मंगळवेढ्याच्या वाट्याला अखेर ‘म्हैसाळ’...सोलापूर ः मंगळवेढ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या...
‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबवा...सोलापूर ः ‘‘जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिव्हिर...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्याने...नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला...
मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस...मुंबई : कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना...
शिरपूर बाजार समिती दिवसाआड कार्यरत...जळगाव ः  खानदेशात शिरपूर (जि. धुळे), जळगाव...
उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह...तुरोरी, जि. उस्मानाबाद : सीमावर्ती भागातील दगड...
लातूरच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना...मुंबई : मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत...
‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर...नाशिक : ‘‘प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई...
आमदारांच्या दारात हलग्या वाजविणारसोलापूर ः उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी...
निविष्ठा खरेदीत गैरप्रकार झाल्यास भरारी...अमरावती : निविष्ठा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक...