कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा पणाला

कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा पणाला
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा पणाला

नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात सहजपणे विजयी झाले. मात्र, या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक रिंगणात उतरल्याने आणि एकास एक लढत होत असल्याने मोठी रंगत आली आहे. त्यामुळे यंदा ‘येथून कोण जिंकणार’ याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप- सेना व राष्ट्रवादी- काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मताची बेरीज करताना जातीय समीकरणेही मांडली जात आहेत. 

पुणे, सोलापूर आणि बीड या तीन जिल्ह्याला जोडून असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शिंदे दोन वेळा निवडून आले. येथून अनेक वर्ष जुन्या काळातील वरिष्ठ नेते आबासाहेब निंबाळकर यांनी प्रतिनिधित्व केले. हा मतदारसंघ सातत्याने चर्चेत राहिला आहे. शिंदे यांना २००९ साली मतविभागणीचा, तर २०१४ साली मोदी लाटेचा फायदा झाला. पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी यंदा मात्र चुरस निर्माण केली आहे. सातत्याने दुष्काळी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या तीन वर्षांपासून पवार वेगवेळ्या माध्यमातून संपर्कात आहेत. उन्हाळ्यात त्यांनी पाण्याचे टॅंकर पुरवले. याशिवाय विविध कार्यक्रमही ते सतत घेत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत ते रंगत आणतील, असे स्पष्ट जाणवत होते. 

पवार यांनी जनसंपर्क वाढवल्यापासून शिंदेही सावध झाले. जलयुक्त शिवार अभियान व अन्य शासनाच्या विविध योजना मतदारसंघात राबवल्या. ‘मोठ्या घरातील व्यक्ती समोर असली तरी शिंदेच जिंकणार’ असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ‘कर्जत- जामखेड तालुक्यातील लोकांवर सत्ता असूनही विकासाबाबत अन्याय झाला आहे. जर विकास केला असता, तर दुष्काळाला सामोरे जावेच लागले नसते. उलट पवार यांनी सत्ता नसतानाही दुष्काळात जनतेला आधार दिला. त्यामुळे जनता लोकप्रतिनिधी म्हणून पवार यांनाच निवडणार आहे.’ असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे.    

दोन्ही बाजूंकडून मोठा खर्च केला जात असल्याचे लोक सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (ता. ११) सभा झाली. अधिकृत सांगितले जात नसले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही सभा होणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही जामखेडवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com