agriculture news in marathi File a case of culpable homicide against the energy minister | Agrowon

`ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा`

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

नाशिक : महावितरण व ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा तहसीलदार व महावितरणच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे केली.

नाशिक : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ३ सख्ख्या भावांचा विद्युत पंप चालू करताना शॉक बसून मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला. महवितरणमुळे शेतकऱ्यांना जीवितास मुकावे लागत आहे. या प्रकरणी महावितरण व ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा तहसीलदार व महावितरणच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे केली. 

राज्यात औद्योगिक वापरासाठी पूर्ण वेळ वीजपुरवठा केला जातो. तर, महाराष्ट्रातील शेती उद्योगावर ८० टक्के घटक अवलंबून असताना शेतकऱ्यांना २४ तासांतील फक्त ८ तास विद्युत पुरवठा केला जातो. त्यात चार दिवस रात्री-अपरात्री पुरवठा केला जातो. सध्या रब्बीची पेरणी सुरू आहे. त्यासाठी शेतीला पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. संघटनेचे प्रांतिक सदस्य दीपक पगार, जिल्हा उपाध्यक्ष डोंगर पगार, भाऊसाहेब पगार व वीरेंद्र पगार उपस्थित होते.

‘रयत’च्या मागण्या

  • शासनाने जाधव कुटुंबास ५० लाखांची मदत करावी. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा
  • शेतकऱ्यांना ३ फेज वीजपुरवठा दिवसा द्या.

पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा 

सटाणा तालुक्यातील तळवाडे या पाझर तलावाचे २५ वर्षांत डागडुजी न केल्यामुळे लाखो लिटर पाणी नदी पात्रात सोडावे लागले. कारण नसताना ३ शेतकऱ्यांवर कलम ३५३ अन्वvये गुन्हा दाखल केला. तो मागे घ्यावा. यासह पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभे करू. त्यास  शासन जबाबदार राहील, असा इशारा या वेळी देण्यात आला.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...