पाणलोट गैरव्यवहाराची चौकशी दडपली

पाणलोट आणि मृद्संधारण कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्यानंतर चौकशी दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे भ्रष्ट लॉबीने कृषी आयुक्तालयाने दिलेले आदेशदेखील धाब्यावर बसवले आहेत.
'सन्मान निधी'चे २०९६ कोटी अडकले
'सन्मान निधी'चे २०९६ कोटी अडकले

पुणे : पाणलोट आणि मृद्संधारण कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्यानंतर चौकशी दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे भ्रष्ट लॉबीने कृषी आयुक्तालयाने दिलेले आदेशदेखील धाब्यावर बसवले आहेत. पाणलोटाच्या कुरणात चरलेल्या अधिकाऱ्यांवर शिताफीने कारवाई टाळली जाते. कृषी अधिकारी या भ्रष्ट यंत्रणेला कसे पाठीशी घालतात, याचे उदाहरण म्हणून यवतमाळ घोटाळ्याची चर्चा आयुक्तालयात चालू आहे. यवतमाळमध्ये नेमका किती कोटींचा घोटाळा कोणत्या कामांमध्ये झाला, हे देखील स्पष्ट झालेले नाही. ‘‘घाटंजी गैरव्यवहारात कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्याकडून तत्पर व पारदर्शक चौकशी होत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. विशेष म्हणजे कृषी आयुक्तालयातून मृद्संधारण संचालक डॉ. कैलास मोते यांनी वारंवार सूचना करूनही सहसंचालक जुमानत नाहीत. त्यामुळे कृषी सचिवांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तालयाने कृषी सहसंचालकाला कळविले आहे, की मृद्संधारण संचालक व आस्थापना सहसंचालकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, अमरावती कृषी सहसंचालक कार्यालयाने कार्यवाही केलेली नाही. या घोटाळ्याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आयुक्तालयाने वारंवार पत्र पाठवून देखील सहसंचालकाने अहवाल सादर केलेला नाही. ‘‘आपण अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्याची दखल घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे खेदजनक आहे,’’ अशा शब्दात आयुक्तालयाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘हा गैरव्यवहार कोण दडपतो आहे, सहसंचालक इतके हतबल का आहेत, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन पत्रे आयुक्तालयाने कृषी सहसंचालकांना पाठवली होती. पत्राने काम होत नाही असे लक्षात आल्यानंतर प्रत्यक्ष दूरध्वनीवरून देखील सूचना दिल्या. मात्र, अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घोटाळ्याला सुभाष नागरे जबाबदार नाहीत, असा दावा कृषी सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी केला आहे. ‘‘हा घोटाळा दाबण्याचा नव्हे तर उघड करण्याचा प्रयत्न नागरे करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत चौकशीची आठ पत्रे काढली आहेत. मात्र, संबंधित घोटाळेबहाद्दराला यवतमाळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पाठीशी घालते आहे. घोटाळे ‘एसएओ’ने करायचे आणि चौकशा सुरू झाल्या की ‘जेडीए’कडे बोट दाखवणारी लॉबी कार्यरत आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com