नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’

कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात विलंब होत असल्याने सामान्य नागरिकांचे काम वेळेत होत नाही. यावर जिल्हा परिषदेने प्रशासनाला गतिमान करून ‘फाइल ट्रॅकर’च्या माध्यमातून तोडगा काढला आहे. त्यामुळे आता फाइलचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'File Tracker' in Nagpur Zilla Parishad
'File Tracker' in Nagpur Zilla Parishad

नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात विलंब होत असल्याने सामान्य नागरिकांचे काम वेळेत होत नाही. यावर जिल्हा परिषदेने प्रशासनाला गतिमान करून ‘फाइल ट्रॅकर’च्या माध्यमातून तोडगा काढला आहे. त्यामुळे आता फाइलचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटल्या जाते. ग्रामीण भागाशी संबंधित शासनाचे जवळपास सर्वच विभाग येथे कार्यरत आहे. रोज शेकडा नागरिक कामासाठी येतात. शिवाय कर्मचाऱ्यांशी संबंधित फाइलही असतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांना चिरीमिरीवर अंकुश लावण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी फाइल फिरवण्यावरून अनेक जण आर्थिक शांती करूनच घेतात. विशेषतः पंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी फाइल मुख्यालयात पाठविल्याचे सांगून वेळ मारून नेतात. प्रत्यक्षात फाइल मुख्यालयात येतच नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. या प्रकारावर आळा घालण्यासाठी सीईओ कुंभेजकर यांनी फाइलला ट्रॅकर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता फाइल एका विभागात किती वेळ राहिली याची माहिती मिळेल. फाइल हाताळण्यास विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई त्यांनी सुरू केली आहे. 

जिल्हा परिषद पहिलीच संस्था  राज्यात अनेक संस्था, कार्यालय आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजकल्याण, आदिवासी, सिटी सर्वे आदी विभागांत कामासाठी नागरिकांना बराच त्रास होतो. नागपूर विभागात ट्रॅकरच्या माध्यमातून फाइलवर लक्ष ठेवणारी जिल्हा परिषद ही पहिलीच संस्था आहे. नागरिकांचे काम खरच वेळेत करायचे असेल तर या प्रणालीचा वापर होण्याची गरज आहे. 

त्रुटी काढून थांबवितात फाइल  काही अधिकारी, कर्मचारी मुद्दाम फाइल प्रलंबित ठेवतात. आणि त्यावर मागच्या तारखेत अनावश्यक त्रुटी दाखवून फाइल दुसऱ्या विभागात पाठवितात. काही फाइलला तर जुनीच त्रुटी नवीन तारखेत दाखविण्याचा प्रताप अधिकारी करतात.

 ...असे होईल काम  ट्रॅकरच्या माध्यमातून मोबाईलची माहिती मिळते. तसेच होणार आहे. प्रत्येक फाइलला बार कोड लावण्यात येईल. ट्रॅकरच्या माध्यमातून बार कोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभाग होईल. त्यानंतर दुसऱ्या विभागात पाठविताना जावक विभागात त्याची नोंद होईल. यामुळे फाइल किती दिवस संबंधित विभागात राहिली त्याची नोंद राहील.

कामे लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे. फाइल एका विभागात किती दिवस राहिली, कोणाकोणाकडे फिरली याची माहिती यातून मिळेल. ही प्रणाली विभागस्तरावर सुरू करण्यात आली असून पुढे विभागांतर्गत सुरू करू. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले.  - योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com