Agriculture news in Marathi 'File Tracker' in Nagpur Zilla Parishad | Page 3 ||| Agrowon

नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 सप्टेंबर 2021

कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात विलंब होत असल्याने सामान्य नागरिकांचे काम वेळेत होत नाही. यावर जिल्हा परिषदेने प्रशासनाला गतिमान करून ‘फाइल ट्रॅकर’च्या माध्यमातून तोडगा काढला आहे. त्यामुळे आता फाइलचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात विलंब होत असल्याने सामान्य नागरिकांचे काम वेळेत होत नाही. यावर जिल्हा परिषदेने प्रशासनाला गतिमान करून ‘फाइल ट्रॅकर’च्या माध्यमातून तोडगा काढला आहे. त्यामुळे आता फाइलचा निकाल लवकर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटल्या जाते. ग्रामीण भागाशी संबंधित शासनाचे जवळपास सर्वच विभाग येथे कार्यरत आहे. रोज शेकडा नागरिक कामासाठी येतात. शिवाय कर्मचाऱ्यांशी संबंधित फाइलही असतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांना चिरीमिरीवर अंकुश लावण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी फाइल फिरवण्यावरून अनेक जण आर्थिक शांती करूनच घेतात. विशेषतः पंचायत स्तरावरील अधिकारी, कर्मचारी फाइल मुख्यालयात पाठविल्याचे सांगून वेळ मारून नेतात. प्रत्यक्षात फाइल मुख्यालयात येतच नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. या प्रकारावर आळा घालण्यासाठी सीईओ कुंभेजकर यांनी फाइलला ट्रॅकर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता फाइल एका विभागात किती वेळ राहिली याची माहिती मिळेल. फाइल हाताळण्यास विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई त्यांनी सुरू केली आहे. 

जिल्हा परिषद पहिलीच संस्था 
राज्यात अनेक संस्था, कार्यालय आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजकल्याण, आदिवासी, सिटी सर्वे आदी विभागांत कामासाठी नागरिकांना बराच त्रास होतो. नागपूर विभागात ट्रॅकरच्या माध्यमातून फाइलवर लक्ष ठेवणारी जिल्हा परिषद ही पहिलीच संस्था आहे. नागरिकांचे काम खरच वेळेत करायचे असेल तर या प्रणालीचा वापर होण्याची गरज आहे. 

त्रुटी काढून थांबवितात फाइल 
काही अधिकारी, कर्मचारी मुद्दाम फाइल प्रलंबित ठेवतात. आणि त्यावर मागच्या तारखेत अनावश्यक त्रुटी दाखवून फाइल दुसऱ्या विभागात पाठवितात. काही फाइलला तर जुनीच त्रुटी नवीन तारखेत दाखविण्याचा प्रताप अधिकारी करतात.

 ...असे होईल काम 
ट्रॅकरच्या माध्यमातून मोबाईलची माहिती मिळते. तसेच होणार आहे. प्रत्येक फाइलला बार कोड लावण्यात येईल. ट्रॅकरच्या माध्यमातून बार कोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभाग होईल. त्यानंतर दुसऱ्या विभागात पाठविताना जावक विभागात त्याची नोंद होईल. यामुळे फाइल किती दिवस संबंधित विभागात राहिली त्याची नोंद राहील.

कामे लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे. फाइल एका विभागात किती दिवस राहिली, कोणाकोणाकडे फिरली याची माहिती यातून मिळेल. ही प्रणाली विभागस्तरावर सुरू करण्यात आली असून पुढे विभागांतर्गत सुरू करू. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. 
- योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...