जुन्नरमध्ये निकृष्ट बियाणेप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

पुणे ः यंदा खरीप हंगामात निकृष्ट दर्जाचे बियाणे प्रकरणी जुन्नर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात एका खासगी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
Filed a case against the company for inferior seeds in Junnar
Filed a case against the company for inferior seeds in Junnar

पुणे ः यंदा खरीप हंगामात निकृष्ट दर्जाचे बियाणे दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यावर कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला दाद दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जुन्नर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात एका खासगी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगामात एका खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. हे बियाणे कंपनीच्या पुण्यातील कार्यालयामार्फत जुन्नर तालुक्यात विक्री केली होती. परंतु, बियाणे उगवले नाही म्हणून तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. यामध्ये शिवाजी रतन आहेर (आणे), रोहिदास प्रभू शिंदे (शिंदेवाडी), भानुदास अनंत शिंदे (शिंदेवाडी), पाडुंरग गंगाराम दाते (आणे), अंजनाबाई विष्णू शिंदे (शिंदेवाडी) तसेच तालुक्यातील आर्वी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, आपटाळे, घोगरेवाडी, कोंबरवाडी, नाळावणे, निरगुडे, आगर, गोळेगाव, बेल्हे या गावांतील ३२ शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रारी केल्या होत्या.

दाखल तक्रारींनुसार, जुन्नर पंचायत समितीचे कृषी अधिकारी विजय खेडेकर, नाराणगाव कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तज्ज्ञ दत्तात्रय गावडे, संबंधित क्षेत्रातील मंडळ कृषी अधिकारी अनिल गंभीरे यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे स्थळ निरीक्षण व पंचनामे केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनची उगवण १५ ते ३० टक्के आढळून आली होती. समितीने बियाण्यांचे निरीक्षण केले असता संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना विक्री केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे आढळून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com