agriculture news in Marathi fill application for agriculture department award till 25 September Maharashtra | Agrowon

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्यास २५ पर्यंत मुदत 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव शुक्रवारपर्यंत (ता.२५) सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी त्यांचे प्रस्ताव शुक्रवारपर्यंत (ता.२५) सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार व उद्यान पंडित पुरस्कारांचा समावेश आहे. 

वसंतराव नाईक कृषी भूषण व जिजामाता कृषी भूषण पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आहे. यासाठी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे शेतकरी, गट, संस्था त्यांचे कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे. प्रस्तावित शेतकरी हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त असावा. शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराचा किमान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असावा.

जिजामाता कृषी भूषण पुरस्कारासाठी शेतीची अट नाही. हा पुरस्कार महिला शेतकऱ्यांना देण्यात येतो. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रूपये धनादेश व स्मृती चिन्ह आहे. या पुरस्कारासाठी स्वत:च्या नावावर शेती असावी व तो कुटूंबासह शेती करणारा असावा, शेतीपूरक व्यवसायाव्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करणारा नसावा. आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतकऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीचा दाखला मूळ प्रतीत दाखल करणे आवश्यक असून प्रस्तावित शेतकऱ्याकडे पाच किंवा त्यापेक्षा जास्त सालदार नसावेत. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्काराचे स्वरूप ७५ हजार रूपये रोख व सन्मानपत्र आहे. हा पुरस्कार केवळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकच व्यक्ती/ गट/ संस्थेस देण्यात येतो. यासाठी शेतकरी, गट किंवा संस्थेस मागील २० ते २५ वर्षांचा शेतीतील अनुभव असावा. कोरडवाहू शेतीकरिता कार्य व कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारा असावा. 

 
शेतीनिष्ठ पुरस्काराचे स्वरुप 
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह आहे. या पुरस्काराकरिता खेड्यामधून परसबाग वृद्धींगत करणाऱ्या महिलांचाही विचार करण्यात येतो. तसेच सक्रिय कृषी विज्ञान मंडळ किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्रियाशील सभासद प्रमुखांचा विचार करण्यात येतो. उद्यान पंडित पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह आहे. 
 

 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...