उपसा योजनांतून सांगलीतील तलाव भरून द्या

उपसा योजनांतून सांगलीतील तलाव भरून द्या
उपसा योजनांतून सांगलीतील तलाव भरून द्या

सांगली ः जिल्ह्यातील टंचाई स्थिती गंभीर होत आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवण्याची भीती आहे. या स्थितीत कृष्णा नदीवरील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ उपसा योजनांच्या कालव्यातून जिल्ह्यातील १०५ तलाव भरून घ्यावेत, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.

जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. मात्र, म्हैसाळ योजना तांत्रिक कारणाने अद्याप बंद आहे. या तिन्ही योजनेच्या कालव्याच्या माध्यमातून दुष्काळी पट्ट्यातील १२० तलाव जोडण्यात आले आहेत. त्यापैकी १०५ तलावात पाणी सोडून पिण्याची पाण्याची देणे गरजेचे आहे, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.

मिरज, जत तालुक्‍यांतील सर्व तलाव म्हैसाळ योजनेतून भरले जातात. तासगाव तालुक्‍यातील १२ तलाव, बंधारे टेंभूतून, १३ आरफळ योजनेतून, पाच ताकारी योजनेतून तर नऊ तलाव म्हैसाळ योजनेतून भरून घ्यावे लागणार आहेत. आटपाडी तालुक्‍यातील १० तलाव टेंभूतून भरून घ्यायचे आहेत. खानापूर तालुक्‍यातून तीन टेंभूने भरायचे आहेत. कडेगाव तालुक्‍यातील चार तलाव टेंभूने तर एक ताकारीने भरायचा आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील सात तलाव म्हैसाळने तर दोन तलाव टेंभूने भरण्याचा प्रस्ताव आहे.

या गावांतील तलाव, बंधारे कोरडे जत ः बसाप्पावाडी, प्रतापपूर, वाळेखिंडी, कोसारी, बेळुखी, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, शेगाव, कुडनूर, अंकले, डोर्ली, हिवरे, शिंगणहळ्ळी, कासलिंगवाडी, बागलवाडी. आटपाडी ः आटपाडी, बनपुरी, जांभूळणी, पानंद, निंबवडे, शेटफळे, माळी वस्ती, अर्जुनवाडी, झरे. खानापूर ः भाग्यनगर, वाळूज, वेजेगाव, चिंचणी अंबक, कडेगाव, शिवाजीनगर, कोतीज, बोंबाळेवाडी, बंडगरवाडी, नांगोळे, हरोली, दुधेभावी, घोरपडी, लंगरपेठ. कवठेमहांकाळ ः लांडगेवाडी, मोरगाव, विठुरायाचीवाडी, धुळगाव, मळणगाव, शिरढोण, देशिंग, भैरववाडी, लोंढे. तासगाव ः धामणी, पाडळी, हातनूर, हातनोली, बलगवडे, मांजर्डे, पेड, सिद्धेवाडी, बस्तवडे, गोटेवाडी, आळते, लिंब, चिखलगोठण, पानमळेवाडी, शिरगाव, विसापूर, तुर्ची, निमणी, ढवळी, वासुंबे, चिंचणी, नागाव कवठे, कुमठे, आळते, पाडळी, विसापूर, वंजारवाडी, पुनदी, अंजनी, नागेवाडी, मणेराजुरी, मतकुनकी, वज्रचौंडी, उपळावी, योगेवाडी, गव्हाण, सावर्डे. मिरज ः एरंडोली, शिपूर, सिद्धेवाडी, मालगाव, लक्ष्मीवाडी, आरग, जानराववाडी, बेडग, बेळंकी, भोसे, सलगरे, सोनी, लिंगनूर, गुंडेवाडी, खंडेराजुरी, करोली (एम), कळंबी, खटाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com