agriculture news in marathi fill the ponds from Mhaisal water Minister Jayant Patil orders officers | Page 2 ||| Agrowon

‘म्हैसाळ’च्या पाण्याने तलाव भरून घ्या : पालकमंत्री जयंत पाटील

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेतून तलाव भरून घ्या, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

जत, जि. सांगली : म्हैसाळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जतचे शेवटचे टोक असलेल्या उमदीपर्यंत बंदीस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. जतच्या जनतेचा कायमचा वनवास संपणार आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ योजनेतून तलाव भरून घ्या, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

 शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लघु वितरीकेच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. जतचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे प्रचार संपवून अचानक जत तालुक्‍यातील येळवी, घोलेश्वर व सनमडी या तीन ठिकाणी बंदिस्त पाइपलाइन लघु वितरीकाच्या कामांना पाटील यांनी भेट दिली. अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. त्यानंतर कामे लवकरच मार्गी लावा, अशा सूचनाही दिल्या. 

या वेळी कार्यकारी अभियंता कुमार पाटील, सहाय्यक अभियंता चोपडे, उपअभियंता मनोज कर्नाळे, उपअभियंता बाबा पाटील, अभिमन्यू मासाळ, मिरजकर उपस्थित होते. 
मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘अंतराळ, वायफळ येथून सुरू होणाऱ्या बंदिस्त पाइपलाइनचे लिकीजचे काम तत्काळ पूर्ण करावे. आवंढी, अंतराळ, मोकाशेवाडी, शिंदेवाडी, बागलवाडी, सिंगणहळी, लोहगाव, बोरगेवाडी, माणेवाडी या गावांना तत्काळ पाणी सोडून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला आधार द्या. पाइपलाइनचे लिकेज काढून सदरच्या गावातील ओढे नाले व तलावात पाणी सोडा.’’


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...