Agriculture news in marathi To fill their own pumpkins Center raises petrol prices: Chief Minister Uddhav Thackeray | Page 2 ||| Agrowon

स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केंद्राकडून पेट्रोल दरात वाढ ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

कॉँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बॅरलचे दर १०६ रुपये प्रति डॉलर होते. सध्याच दर हे प्रति बॅरल ६३ डॉलर एतके कमी असतानाही केंद्राने स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी सेस वाढविला आहे.

मुंबई : कॉँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बॅरलचे दर १०६ रुपये प्रति डॉलर होते. सध्याच दर हे प्रति बॅरल ६३ डॉलर एतके कमी असतानाही केंद्र सरकारने स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी पेट्रोलवरील सेस वाढविला आहे. त्‍यामुळे देशात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. अद्यापही राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे २९ हजार कोटी आणि अतिवृष्टीचे ४ हजार कोटी केंद्राने दिलेले नाहीत. कोरोनामुळे राज्याचे आर्थिक उत्पन्न कमी झालेले असतानाही सरकारने शेतकऱ्यांना ६० हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

आज (सोमवारी, ता.१) सुरू होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला रविवारी (ता. २८) आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या वेळी अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे म्हणाले,‘‘कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याचा जिद्दीने राज्य सरकार काम करीत आहे. कोरोना संकटातील उपाययोजनांमध्ये राज्य सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला. धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्तीचे जगभरात कौतुक होत असताना, विरोधकांचा आरोप म्हणजे कोव्हिड योद्ध्यांचा अपमान आहे. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे.’’ 

कर्नाटक सीमा प्रश्‍नाबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘ केंद्रात आणि कर्नाटकमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्‍न सहज सुटण्यासारखा आहे. मात्र त्यांना हा प्रश्‍न सोडवायचा नाही. मात्र, विरोधक सीमा प्रश्‍नासाठी आमच्या सोबत आले तर आम्ही नक्कीच हा प्रश्‍न मार्गी लावू.’’ 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीतून सत्य बाहेर येईल 
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी नैतिक अधिकारातून राजीनामा दिला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, विहीत वेळेत टौकशी पूर्ण करून अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल. पुजा चव्हाण यांच्या आई, वडील आणि बहिणीने माझी भेट घेऊन, तपास यंत्रणा आणि सरकारवर विश्‍वास व्यक्त केल्याचे पत्र देखील दिले आहे, असेही ठाकरे यांनी सागिंतले. 

सरकारला अधिवेशनात चर्चा नको : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कुठल्याही प्रकारची चर्चा नको आहे. हे सरकार फक्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचेच काम करीत आहे,’ असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. भाजप आणि सहयोगी पक्षाचे नेते या वेळी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, ‘‘सरकारकडून ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, ना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले. अवकाळीच्या मागे अवकाळी येऊन गेल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेली एकही घोषणा पूर्णत्वास गेली नाही. शेतकऱ्यांना न वापरलेल्या विजेचे बिल आले आहे. सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसतानाही मोगलाईप्रमाणे वीजबिल वसुली सरकार करीत आहे.’’ कोविड काळात झालेला भ्रष्टाचार आम्ही सभागृहात मांडू. संत नामदेव महाराजांची ७५०वी जयंती वर्ष यंदा आहे. पण त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. वैधानिक विकास मंडळाचे गठन न करणे हा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राशी द्रोह आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सर्व पुरावे असताना काहीही कारवाई होत नाही. पोलिसांची इतकी लाचार अवस्था कधीच पाहिली नाही, असेही फडणवीस म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...