खानदेशातील अनेक प्रकल्प भरले

जळगाव : खानदेशातील अनेक मध्यम व मोठे प्रकल्प या महिन्यात भरले आहेत. त्यात धुळ्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.
 Filled many projects in Khandesh
Filled many projects in Khandesh

जळगाव : खानदेशातील अनेक मध्यम व मोठे प्रकल्प या महिन्यात भरले आहेत. त्यात धुळ्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोऱ्यातील अग्नावती, हिवरा, जामनेरातील तोंडापूर, पारोळ्यातील बोरी, रावेरातील मंगरूळ, अभोरा, सुकी, गारबर्डी हे प्रकल्प भरले आहेत.

यावलमधील मोर प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू असून, त्याचे दोन दरवाजे उघडे आहेत. चोपड्यातील गूळ प्रकल्पातील आवकही सुरू आहे. तो देखील १०० टक्के भरणार आहे.जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये वाघूर धरणातील आवक सुरू आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरण्यापूर्वीच त्याच्या दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यात ९५ टक्क्यांवर पाणी आहे.

गिरणा धरणातील साठाही या आठवड्यात ७० टक्क्यांवर पोचण्याची अपेक्षा आहे. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पातील आवकही सुरू आहे. त्याच्या १२ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळाली. धुळ्यातील मालनगाव, कनोली, पांझरा हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शिरपुरातील अनेर प्रकल्पातील आवकही सुरू आहे. त्याच्या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नंदुरबारमधील दरा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. अलीकडेच शहादा तालुक्यातील सुसरी प्रकल्प १०० टक्के भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातील सुसरी, गोमाई, अक्कलकुवामधील सातपुड्यातील उदय, तळोद्यातील खरडी या नद्यांना चांगले प्रवाही पाणी आहे. जळगाव जिल्ह्यातही हिवरा, अंजनी, वाघूर, गिरणा, तापी या नद्यांमध्ये प्रवाही पाणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com