Agriculture news in marathi Filled with millet grains A small amount of grains | Agrowon

बाजरीच्या कणसात भरले अल्प प्रमाणात दाणे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

देऊळगावराजा तालुक्यात काही शेतकऱ्यांची बाजरी कमी उगवली, काहींच्या पिकात कणसे, फुलोरा अत्यंत कमी प्रमाणात भरल्याने उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नाही. या बाबत कृषी विभागाकडे गोंधनखेड येथील शेतकऱ्याने तक्रारही केली आहे.

बुलडाणा : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची वाट बदलून नवीन पीक पद्धती अंगीकारावी, असे सल्ले नेहमी दिले जातात. शेतकरीही यासाठी पुढे येतात. मात्र, प्रयत्न करूनही जर बियाण्यात दोष असेल तर शेतकरी फसतो. असाच प्रकार बाजरी पिकाबाबत जिल्ह्यात समोर आला आहे. देऊळगावराजा तालुक्यात काही शेतकऱ्यांची बाजरी कमी उगवली, काहींच्या पिकात कणसे, फुलोरा अत्यंत कमी प्रमाणात भरल्याने उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता नाही. या बाबत कृषी विभागाकडे गोंधनखेड येथील शेतकऱ्याने तक्रारही केली आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार देऊळगावराजा तालुक्यातील गोंधनखेड येथील सखाराम गिते यांनी यंदा रब्बीत बाजरीची लागवड केली होती. पीक चांगले जुळूनही आले. परंतु त्यावर अत्यल्प कणसे व त्यात दाणे भरले. फुलोरच आलेला नसल्याचे दिसून आले.

बियाण्याच्या माध्यमातून कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार कृषी खात्याकडे करण्यात आली होती. या नंतर उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनात तालुकास्तरीय पथकाला सोबत घेत बांधावर जाऊन पाहणी केली. या वेळी अत्यंत अल्प प्रमाणात कणसात दाणे भरलेले दिसून आले. समितीच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कानवडे, तालुका कृषी अधिकारी रोहीदास मासाळकर व इतर सहभागी होते.

प्रतिक्रिया

बाजरीच्या पिकाबाबत गोंधनखेड येथील शेतकऱ्याची प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका समितीने भेट देऊन पिकाची पाहणी केली. यात कणसात दाणे भरलेले नसल्याचे समितीला दिसून आले. समितीत माझ्यासह तालुका कृषी अधिकारी, कंपनी प्रतिनिधी, बियाणे विक्रेता, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ व समितीचे सर्व सदस्य, शेतकरी आदी उपस्थित होते. या बाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अनुषंगाने कंपनीला निर्देश दिले आहेत.
- वसंत राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर, जि. बुलडाणा


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...