नांदेड, हिंगोली, परभणीत १६ लाख ६१ हजार हेक्टरवर खरीप पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामात १६ लाख ६१ हजार ५० हेक्टरवर पेरणी झाली. या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी यंदाही सोयाबीन पिकाला सर्वाधिक पसंती दिली असून, खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५१.९४ टक्के क्षेत्र एकट्या सोयाबीनचे आहे. कपाशी, तूर, मूग, उडीद ही कडधान्ये तर ज्वारी, बाजरी, भात या तृणधान्य पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख ६ हजार ६६७ हेक्टर आहे. नुकतेच कृषी विभागाने खरिपाचे पेरणी क्षेत्र अंतिम केले आहे. त्यानुसार यंदा १६ हजार ६१ हजार ४५० हेक्टरवर पेरणी झाली. यंदा या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्रामध्ये एकट्या सोयाबीन पिकाचे पेरणी क्षेत्र अर्ध्याहून अधिक ८ लाख ६३ हजार ६९ हेक्टर म्हणजेच ५१.९४ टक्के एवढे राहिले.  उर्वरित ४८.०६ टक्के क्षेत्रावरील पिकांमध्ये कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, भात, तीळ, कारळ या पिकांचा समावेश आहे. कपाशीच्या लागवड क्षेत्रात १लाख ४५ हजार ६५६ हेक्टरने घट झाली आहे.

तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांखालील क्षेत्र १ लाख १६ हजार १३४ हेक्टरने कमी झाले आहे. तृणधान्य पिकांमध्ये मका वगळता ज्वारी, बाजरी या पिकांच्या क्षेत्रात मिळून एकूण १ लाख ६८ हजार ३८५ हेक्टरने घट झाली आहे. भात पिकाखालील क्षेत्रात ५ हजार ९५७  हेक्टरने घट झाली आहे. तीळ, कारळे या पिकांच्या क्षेत्रात १० हजारांवर हेक्टरने घट झाली आहे.  

जिल्हानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
नांदेड   ८,८३,५०९ ७,५८,४०५  ९०.९९
परभणी  ५,२१,८७० ५,३५,३६२ १०२.५९
हिंगोली  ४,०१,२८८  ३,६७,६८३  ९१.६३

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील पीकनिहाय पेरणी क्षेत्र(हेक्टर)

पीक  सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी क्षेत्र
सोयाबीन ५,३५,३७८ ८,६३,०६९
कापूस ६,३१,४४२ ४,८५,७८६
तूर १,८५,९८६ १,५२,४५१
मूग ९७,२१९ ५५,२२०
उडीद  ७६,६७२ ३६,०७२
ज्वारी २,०८,२०४ ४५,७९८
बाजरी ६७६१ ६२०
मका ३२९२  ३४५४
भात ६८७८ ९२१
तीळ ६२७३ ६४२
कारळे ५२९४ ४१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com