Agriculture news in Marathi The final phase of paddy cultivation in the district | Agrowon

पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी भातकाढणीस सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्यातील भात उत्पादक शेतकरी जवळपास एक ते दीड महिन्यापासून काढणी करत असून, आता काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात असलेली मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके ही भाताची तालुके म्हणून ओळखली जातात. यंदा पश्चिम भागातील उशीराने दाखल झालेल्या पावसामुळे उशीराने भात लागवडी झाल्या होत्या. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात भाताचे सरासरी ७२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. 

पुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी भातकाढणीस सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्यातील भात उत्पादक शेतकरी जवळपास एक ते दीड महिन्यापासून काढणी करत असून, आता काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात असलेली मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके ही भाताची तालुके म्हणून ओळखली जातात. यंदा पश्चिम भागातील उशीराने दाखल झालेल्या पावसामुळे उशीराने भात लागवडी झाल्या होत्या. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात भाताचे सरासरी ७२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. 

त्यापैकी ५७ हजार ८१७ हेक्टर म्हणजेच जवळपास ७९ टक्के भाताची पुनर्लागवडी झाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी, फुले समृद्धी अशा वाणाच्या भाताची लागवड केली होती. याशिवाय पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम या वाणाकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला होता. परंतु शेतकऱ्यांनी इंद्रायणी या वाणाची सर्वाधिक लागवड केली होती. 

सुरूवातीच्या काळात कमी पाऊस असल्याने भात पिके जोमात होती. परंतु वाढीच्या अवस्थेत आणि काढणी करण्याच्या अवस्थेत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भात काढणी जलद गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे मावळ तालुक्यातील आंदर मावळ येथील भात उत्पादक शेतकरी बजाबा मालपोटे यांनी सांगितले.

तालुकानिहाय झालेली भात लागवड, हेक्टरमध्ये
तालुका भात लागवड
हवेली १९९६
मुळशी ७६५७
भोर ७५१०
मावळ १२,४६२
वेल्हे ५१८४
जुन्नर १०,३७०
खेड ७२३३
आंबेगाव ५२३४
पुरंदर १७१

 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...