Agriculture news in marathi; In the final phase of paddy cultivation in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून भात अवनीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात कृषी विभागातर्फे ७० हजार ६३२ हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र लागवडीचा टक्का वाढला असून, ही लागवड ७१ हजार १४९ हेक्टरवर झाली आहे. सध्या लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून भात अवनीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात कृषी विभागातर्फे ७० हजार ६३२ हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र लागवडीचा टक्का वाढला असून, ही लागवड ७१ हजार १४९ हेक्टरवर झाली आहे. सध्या लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 

जिल्ह्यात प्रामुख्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी व नाशिक तालुक्यात भाताचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, मध्यंतरीच्या काळात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भातलागवडीची कामे लांबणीवर पडली होती. त्यामुळे अवनीच्या कामांना फटका बसला होता. उशिरा आलेला मॉन्सून व मुसळधार पाऊस ही त्यामागील प्रमुख कारणे होती. चालू वर्षी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात प्रस्तावित क्षेत्रापेक्षा लागवड वाढली असून सुरगाणा, दिंडोरी व नाशिक तालुक्यांत क्षेत्र घटले आहे. त्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांनी पाऊस उघडण्याचा अंदाज घेऊन ही कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत. यामध्ये इंद्रायणी, ओम, सोनम, जानकी, आर २४, एक हजार आठ, राधा फुले आणि मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात इंद्रायणी भाताचे वाण सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात मागणी चांगली असते. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पावसामुळे  भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
यामध्ये पारंपरिक तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. जिल्ह्यात १०० टक्क्यांहून अधिक प्रस्तावित क्षेत्रावर भात पिकाची लावणी पूर्ण झाली असून, सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...