Agriculture news in marathi, The final phase of the three sugar factory operations | Agrowon

तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

सोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जप्रकरणी खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगर, करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्स व आदित्यराज शुगर्सची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. विजय शुगर्सची लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आर्यन शुगर्सची मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतली आहे. उर्वरित ९७ एकर जागाही बँकेच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत’’, अशी माहिती जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी दिली. 

सोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जप्रकरणी खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगर, करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर्स व आदित्यराज शुगर्सची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. विजय शुगर्सची लिलाव प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आर्यन शुगर्सची मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतली आहे. उर्वरित ९७ एकर जागाही बँकेच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत’’, अशी माहिती जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी दिली. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सभा बँकेच्या सभागृहात पार पडली. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्यन, विजय आणि आदित्यराज या तीनही संस्थांकडे २५६ कोटींची कर्जे थकीत आहेत. त्यामुळे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ४३ टक्क्यांवर पोचले आहे. यामुळे या संस्थाच्या मालमत्ता ताब्यात घेणे, त्यांचा लिलाव करून विक्री करण्यास प्राधान्य असल्याचे कोतमिरे यांनी सांगितले. 

मागील वर्षभरात बँकेचे खातेदार व ठेवींमध्ये वाढ झाली आहे. १ लाख ५२ हजार नवीन खातेदार, तर ३८२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २३०० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या, आता त्या २७१२ कोटी रुपयांवर आहेत. ३१ मार्चअखेर बिगरशेती कर्जाची वसुली २०२ कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योजकांच्या वसुलीवरच शेती कर्जे अवलंबून

जिल्ह्यात लहान उद्योजकांना कर्जवाटपास अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६०० गट स्थापन केले. एका गटांमध्ये चार जणांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर व माढा या तालुक्यांत ५ कोटी ८८ लाख रुपयांचे वाटप केले आहे. दुसऱ्या टप्प्यात माळशिरस, सांगोला, मंगळवेढा व करमाळा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला.

२५ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. पण, शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाबाबत अद्यापही काही पावले उचलली नाहीत, हे एका दिवसात होणारे काम नाही. वेळ लागेल, पण ते काम आपण करु. मोठी थकीत कर्जे वसूल झाली की शेती कर्जाबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी एका उत्तरात सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...