मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील पिके बाधित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१ लाख ४९ हजार १७५.३० हेक्‍टरवरील विविध पिके बाधित झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले असून तब्बल १९ लाख ६६ हजार ७३ हेक्‍टरवरील सोयाबीनला फटका बसला आहे. त्याखालोखाल जिरायती व बागायती मिळून १४ लाख ६३ हजार ६५८ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांत यंदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. सप्टेंबर अखेरपर्यंत अनियमित व असमान पडणारा पाऊस ऑक्टोबरमध्ये मात्र सर्वदूर व जोरदार पडला होता. या पावसामुळे मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासकीय नियमांनुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे काम प्रशासकीय स्तरावरून हाती घेण्यात आले. पंचनाम्यांची प्रक्रिया आटोपली असून मराठवाड्यातील पीकनिहाय नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

त्यानुसार मराठवाड्यात सर्वाधिक १९ लाख ६६ हजार ७३ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ १४ लाख ३४ हजार ६०९ हेक्टरवरील जिरायती कपाशीचे व २९ हजार ४९ हेक्टरवरील बागायती कपाशीचे पिकाचे नुकसान झाले. एकूण पेरणी केलेल्या मका पिकापैकी २ लाख ५६ हजार ६८ हेक्टरवरील पिकाला फटका बसला. तसेच १ लाख ४ हजार ८९३ हेक्टरवरील बाजरीचे, ८१ हजार १९५ हेक्टरवरील ज्वारीचे, ९६ हजार ८ हेक्‍टरवरील तुरीचे, १४११ हेक्‍टरवरील मुगाचे तर जवळपास १ लाख ६ हजार ९६५ हेक्टरवरील इतर जिरायती पिकांचे नुकसान झाले. ७ हजार ४९७ हेक्टरवरील भाजीपाला पिकांना फटका बसला. २४४२ हेक्टरवरील मिरचीचे, ५९२ हेक्‍टरवरील भुईमुगाचे, २४ हजार ९८४ हेक्टरवरील कांदा पिकाचे, ४८२ हेक्टरवरील केळी पिकाचे तर ४३६३ हेक्‍टरवरील इतर बागायती पिकांचे नुकसान झाले. 

फळ पिकांमध्ये ४७३.८० हेक्‍टरवरील केळीचे, ७४०३.३३ हेक्‍टरवरील द्राक्षांचे, ९९९.३४ हेक्टरवरील पपईचे, ७ हजार १५२. ८५ हेक्‍टरवरील डाळिंबाचे, १४ हजार ५१५.५ हेक्‍टरवरील मोसंबीचे,१८४.२० हेक्‍टरवरील आंब्याचे, २७५.८० हेक्‍टरवरील चिकूचे, ८७ हेक्‍टरवरील संत्राचे तर १४६१.०१ हेक्‍टरवरील इतर फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.    

सोयाबीनचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टर)
औरंगाबाद   १०,३६४
जालना १,३८,१५३
परभणी २,५४,०४४
हिंगोली   २,२३,२०३
नांदेड ३,७५,३७३
बीड २,४६,८५४
लातूर  ४,०७,१४६
उस्मानाबाद  ३,१०,९३३
जिरायती कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टर)
औरंगाबाद  ३,५०,१३९
जालना  २,६६,४७३
परभणी १,८५,५७८
हिंगोली ३९,४२३
नांदेड  २,०४,१६५
बीड ३,६६,७२८
लातूर १२,६७८
उस्मानाबाद ९४२२
बागायती कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टर)
जालना   २८,९९८
लातूर  ५१.२०
भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्र(हेक्टर)
औरंगाबाद  २०७३
जालना  १०२९
परभणी १४९५
हिंगोली    ३५
नांदेड ५९
लातूर १९४१
उस्मानाबाद ८६४
जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी
औरंगाबाद    ६,३८,३०४
जालना   ५,८२,२६८
परभणी ४,६३,३७१
हिंगोली   ३,०१,९६०
नांदेड ७,१८,४३६
बीड ८,२४,७५९
लातूर  ४,८६,००४
उस्मानाबाद  ४,१८,४४७ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com