बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती उपविभागातील सुमारे ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. विभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांतील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानीचा अंतिम अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी शासनाला सादर केला आहे. नुकसानीमध्ये प्रामुख्याने मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, फुले, आणि फळबागांचा समावेश आहे. निकषांनुसार नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे.  

पावसाचा सर्वाधिक फटका नगदी पिके असलेल्या द्राक्ष, डाळिंब, कांदा, सीताफळ, अंजिरासह भाजीपाला पिके आणि फुल पिकांना बसला आहे. पावसामुळे द्राक्षांची घडकुजीचे प्रमाण वाढले आहे. डाळिंब फुटली असून, काळी पडली आहेत. सीताफळावर काळी बुरशीचे प्रमाण वाढले असून, फळेदेखील मोठ्याप्रमाणावर फुटली आहेत. परिणामी, उत्पादन देखील घटले आहे. फळबागांच्या संगोपनासाठी फवारणीसह अन्य खर्च वाढला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक आणि खातेदारनिहाय कर्जाचा तपशील संकलित करण्याचे काम सुरू असून, पीककर्जाची आकडेवारी शासनाला सादर केली जाणार आहे. यानंतर शासकीय निकषांनुसार नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे.  

तालुकानिहाय नुकसान स्थिती 
तालुका गावांची संख्या  बाधित शेतकरी क्षेत्र (हेक्टर)
बारामती  ११७  २९ हजार १७३ १७ हजार २२९
इंदापूर १४१ १४ हजार ३३ ७ हजार ४३१
दौंड  ९८  १५ हजार ५९१ ७ हजार ९२२ 
पुरंदर  १०५ २३ हजार २३८ ११ हजार १४९
एकूण  ४६१ ८२ हजार १२८ ४३ हजार ७३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com