नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नगर जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अंतिम अहवाल तयार केला आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संयुक्त सह्यांनी अहवाल शासनाला पाठवला आहे. - शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः अतिवृष्टीने जिल्ह्यातील १५८३ गावांतील सुमारे सहा लाख ३६ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५४ हजार १२ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून प्रारंभी केलेल्या नजर अंदाजापेक्षाही हे नुकसान जास्त आहे. झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी तब्बल ४७५ कोटी १० लाखांची गरज आहे. कृषी विभाग व महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याच्या अंतिम अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हा अंतिम अहवाल शासनाला पाठवला आहे.  

जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात सलग २३ दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष करून बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मका, कांदा यासह भाजीपाला, फळबागा व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान झालेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे केले. त्यांचा अंतिम अहवाल शुक्रवारी तयार केला असून तो तातडीने शासनाला पाठवला आहे. त्यानुसार १५८३ गावांत अतिवृष्टीने सुमारे सहा लाख ३६ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५४ हजार १२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून प्रारंभी केलेल्या नजरअंदाजापेक्षाही हे नुकसान जास्त आहे. झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीकरिता तब्बल ४७५ कोटी १० लाखची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान पाथर्डी तालुक्यात ६१,७८१ हजार हेक्टर क्षेत्राचे  झाले आहे. बागायती क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले असल्याने नेवासा तालुक्यासाठी सर्वाधिक ५४ कोटी ७१ लाखांची गरज असल्याचे सांगण्यात आले.   

नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टर), कंसात शेतकरी 

  • जिरायती क्षेत्र    २,१६,५८७ (२,८७,९४६)
  • बागायत क्षेत्र    २,२१,१९८ (२,३४,५२१)
  • फळबागा    १६,२२६ (२३,६८९)
  • जिरायतीसाठी मदतीची गरज    १४७ कोटी २७ लाख 
  • बागायतीसाठी मदतीची गरज    २९८ कोटी ६१ लाख 
  • फळबागांसाठी मदतीची गरज    २९ कोटी २० लाख 
  • तालुकानिहाय हेक्टर क्षेत्राचे नुकसान व कंसात मदतीची गरज  नगर ः २१७३१ (२२ कोटी ४० लाख), पारनेर ः २२२१६ (२७ कोटी १९ लाख), पाथर्डी ः ६१७८१ (४५ कोटी ५६ लाख), कर्जत ः २६७५३ (३० कोटी ११ लाख), श्रीगोंदा ः ३१६४८ (४२ कोटी), जामखेड ः ५२१५ (६ कोटी १८ लाख), श्रीरामपूर ः २९४७२ (३८ कोटी ७८ लाख), राहुरी ः ३०९८२ ( ३९ कोटी ६६ लाख), नेवासा ः ४५२२२ (५४ कोटी ७१ लाख), शेवगाव ः ५९७०५ (४५ कोटी ४३ लाख), संगमनेर ः ३७१९८ (३६ कोटी ३२ लाख), अकोले ः २८३९९ (२५ कोटी ७२ लाख), कोपरगाव ः ३२३२६ (४२ कोटी ३६ लाख), राहाता ः २१३५८ (१८ कोटी ६३ लाख).  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com