agriculture news in marathi, final report submitted of crops damage, nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नगर जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अंतिम अहवाल तयार केला आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संयुक्त सह्यांनी अहवाल शासनाला पाठवला आहे.
- शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर.

नगर  ः अतिवृष्टीने जिल्ह्यातील १५८३ गावांतील सुमारे सहा लाख ३६ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५४ हजार १२ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून प्रारंभी केलेल्या नजर अंदाजापेक्षाही हे नुकसान जास्त आहे. झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी तब्बल ४७५ कोटी १० लाखांची गरज आहे. कृषी विभाग व महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याच्या अंतिम अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हा अंतिम अहवाल शासनाला पाठवला आहे.  

जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात सलग २३ दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष करून बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मका, कांदा यासह भाजीपाला, फळबागा व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान झालेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे केले. त्यांचा अंतिम अहवाल शुक्रवारी तयार केला असून तो तातडीने शासनाला पाठवला आहे. त्यानुसार १५८३ गावांत अतिवृष्टीने सुमारे सहा लाख ३६ हजार १४६ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५४ हजार १२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून प्रारंभी केलेल्या नजरअंदाजापेक्षाही हे नुकसान जास्त आहे. झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीकरिता तब्बल ४७५ कोटी १० लाखची गरज असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान पाथर्डी तालुक्यात ६१,७८१ हजार हेक्टर क्षेत्राचे  झाले आहे. बागायती क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले असल्याने नेवासा तालुक्यासाठी सर्वाधिक ५४ कोटी ७१ लाखांची गरज असल्याचे सांगण्यात आले. 
 

नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टर), कंसात शेतकरी 

  • जिरायती क्षेत्र    २,१६,५८७ (२,८७,९४६)
  • बागायत क्षेत्र    २,२१,१९८ (२,३४,५२१)
  • फळबागा    १६,२२६ (२३,६८९)
  • जिरायतीसाठी मदतीची गरज    १४७ कोटी २७ लाख 
  • बागायतीसाठी मदतीची गरज    २९८ कोटी ६१ लाख 
  • फळबागांसाठी मदतीची गरज    २९ कोटी २० लाख 

तालुकानिहाय हेक्टर क्षेत्राचे नुकसान व कंसात मदतीची गरज 
नगर ः २१७३१ (२२ कोटी ४० लाख), पारनेर ः २२२१६ (२७ कोटी १९ लाख), पाथर्डी ः ६१७८१ (४५ कोटी ५६ लाख), कर्जत ः २६७५३ (३० कोटी ११ लाख), श्रीगोंदा ः ३१६४८ (४२ कोटी), जामखेड ः ५२१५ (६ कोटी १८ लाख), श्रीरामपूर ः २९४७२ (३८ कोटी ७८ लाख), राहुरी ः ३०९८२ ( ३९ कोटी ६६ लाख), नेवासा ः ४५२२२ (५४ कोटी ७१ लाख), शेवगाव ः ५९७०५ (४५ कोटी ४३ लाख), संगमनेर ः ३७१९८ (३६ कोटी ३२ लाख), अकोले ः २८३९९ (२५ कोटी ७२ लाख), कोपरगाव ः ३२३२६ (४२ कोटी ३६ लाख), राहाता ः २१३५८ (१८ कोटी ६३ लाख).  


इतर ताज्या घडामोडी
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः...अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती...
सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना...सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी...
परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर...परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे....
आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे...निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व...
नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा...नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी...
जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८००...जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्के; दाखविला...अकोला  ः शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्केच होत...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...