अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत रंगत

अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत रंगत
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत रंगत

सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात वातावरण शांत होते. पण, अंतिम टप्प्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यामुळे प्रचाराची रणधुमाळी रंगू लागली आहे. काही मतदारसंघांत मात्र वातावरण शांतच आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक नेहमीच गाजत आली आहे. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नेत्यांनी जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांत हजेरी लावत वातावरण ढवळून काढले आहे. जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भलत्याच रंगतात. या वेळी मात्र वातावरण म्हणावे तितके तापताना दिसले नाही. पहिला टप्पा तर अगदीच कोरडा गेला. 

ना प्रचार सभा, ना पदयात्रा. कोपरा सभा तर फारशा झाल्या नाहीत. अर्ज भरताना नेहमी पुंगळ्या काढून मोटारसायकली पळवत मिरवणुका निघायच्या. पण, तसे दृश्य या वेळी कोठेच दिसले नाही. लाउडस्पीकरवरून प्रचारही फारसा दिसत नाही. शक्तिप्रदर्शन करण्याच्या व्यापातही कोणी दिसत नाही. यामुळे प्रचारात काही चैतन्य नाही. याला काही मतदारसंघांतील लढती एकतर्फी असल्याचे कारण आहे. त्यामुळे या मतदारसंघात वातावरण शांतच आहे.

अंतिम टप्प्यात मात्र प्रचारात रंगत आली आहे. देश व राज्यपातळीवरील काही नेत्यांनी जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यामुळे काही प्रमाणात निवडणूक प्रचारात रंगत आली आहे. 

अंडर करंट, सोशल मीडियाचा परिणाम 

निवडणुकीत रंगत नसल्याची चर्चा लोकांत सुरू आहे. सोशल मीडियातून होत असलेला प्रचार याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या पोस्ट व्हायरल करीत असल्याने काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. बहुसंख्य उमेदवार भेटी-गाठीवर भर देत आहेत. यामुळे मतदारांत अंडर करंट आहे. याचा परिणाम निवडणुकीनंतर दिसेल, असे युवकांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com