agriculture news in marathi, final voting percentage status, mumbai, maharashtra | Agrowon

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोलीत सर्वाधिक मतदान
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोलीत सर्वाधिक म्हणजे ६६.६०, तर सोलापूर मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५८.४५ टक्के मतदान झाले आहे. दहा लोकसभा मतदारसंघात एकूण ६२.९१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (ता. १८) राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दहा लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले होते. बहुतांश मतदारसंघात संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम आकडेवारी स्पष्ट होऊ शकली नव्हती.

मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोलीत सर्वाधिक म्हणजे ६६.६०, तर सोलापूर मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५८.४५ टक्के मतदान झाले आहे. दहा लोकसभा मतदारसंघात एकूण ६२.९१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (ता. १८) राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दहा लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले होते. बहुतांश मतदारसंघात संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम आकडेवारी स्पष्ट होऊ शकली नव्हती.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार हिंगोलीनंतर बीड आणि त्याखालोखाल अमरावतीत ६३.८६ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात दहा मतदारसंघात एकूण १ कोटी ८५ लाख मतदारांपैकी १ कोटी १६ लाख ६७ हजार ५०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष ६२ लाख ८६ हजार ८७९ तर ५३ लाख ८० हजार ५७५ स्त्री मतदारांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक होती तेथे १३ लाख ४८ हजार ८५६ मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी  ः बुलडाणा ६३.६८,अकोला ६०, अमरावती ६३.८६,हिंगोली ६६.६०, नांदेड ६५.१५,परभणी ६३.१९, बीड ६६.०८, उस्मानाबाद ६३.४२ ,लातूर ६२.२०, सोलापूर ५८.४५.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...