अंतिम वर्षाची परीक्षा नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर उत्तीर्ण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
अंतिम वर्षाची परीक्षा नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अंतिम वर्षाची परीक्षा नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर उत्तीर्ण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ही घोषणा केली. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सेमिस्टर परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येईल. “परीक्षा घेण्याबद्दल कुलगुरुंची मते जाणून घेतली. सध्याच्या परिस्थितीत तातडीने परीक्षा घेणे शक्य नाही. आमच्यातला पालक आजही जिवंत आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याऐवजी आतापर्यंत झालेल्या सेमिस्टरमधील सरासरीच्या आधारावर पास करण्यात येईल” असे ते म्हणाले. “कुठल्याही परिस्थितीत शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना असे वाटते की, आपण जास्त मार्क मिळवू शकतो, त्यांच्यासाठी योग्य वेळी परीक्षा घेण्यात येईल” असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शाळा नव्हे शिक्षण कधी सुरू करायचा हा मुद्दा आहे. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येईल असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राने आता कोविड लॉकडाउनमधून बाहेर येत पुनश्च हरी ओम करायची वेळ आल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आपल्याच लोकांनी दूषणे दिली असा भाजपच्या आरोपांचा उल्लेख करीत त्यांनी स्थलांतरितांसाठी गाड्या दिल्याबद्दल रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले.

पावसाळ्यासाठी सज्ज पावसाळा येतो आहे. या काळात फ्लू-सर्दी होत असते. नागरिकांना अशा परिस्थितीत जवळच्या जवळ उपचार मिळावेत यासाठी दवाखाने सुरू केले जातील. वाट निसरडी आहे, शेवाळ आहे पण सरकार आणि नागरिकांनी हातात हात घेवून एकमेकांना धरून चालणे गरजेचे आहे. मृत्यूदर शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. सध्या महाराष्ट्रात २०० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. काही वेळा या सुविधेपेक्षाही प्राणवायूची गरज आहे. अशा २५ हजार बेड राज्यात उपलब्ध आहेत. राज्य पावसाळी आपत्तीसाठी सज्ज असल्याचे सांगून ते म्हणाले, मुंबईत जंबो रुग्णालये तयार झाली आहेत. गोरेगावला जे नेस्कोचे ठिकाण आहे तेथे अन्य कार्यक्रम सुरु रहातील आणि रुग्णालयही काम करत राहील.

मच्छीमारांनी काळजी घ्यावी पश्चिम किनारपट्टीवर वादळ घोंघावते आहे त्यामुळे मच्छीमारांनी पुढचे चार दिवस समुद्रात जाऊ नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

आरोग्य, शिक्षणाला महत्त्व ते पुढे म्हणाले की, मुंबईत फिल्ड हॉस्पिटल सुरू केले आहेत. येत्या काळात आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य द्यायचे. ग्रामीण भागात इन्फेक्शन हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे. आरोग्य सुविधा कमी वेळत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com