अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनी

चोपडा, जि. जळगाव : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत ३ सप्टेंबरला पुणे साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यानुसार ई-निविदा प्रक्रिया सुरू होती.
Finally to ‘Chosaka’ Received revival
Finally to ‘Chosaka’ Received revival

चोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत ३ सप्टेंबरला पुणे साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यानुसार ई-निविदा प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास पुणे येथे साखर आयुक्तालयात निविदा उघडण्यात आली. या प्रक्रियेत चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचे ११५ रुपये प्रतिटन टॅगिंगप्रमाणे सर्वांत उंच ई-टेंडर बारामती ॲग्रोने घेतले. त्यामुळे अखेर ‘चोसाका’ला संजीवनी मिळाली’’, अशी माहिती ‘चोसाका’चे अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी दिली. 

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत शेतकऱ्यांसह कामगारांची सर्वसाधारण सभा १३ ऑगस्ट २०१९ ला होऊन सर्व कामगार व शेतकरी यांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्यानुसार मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यात लक्ष घालून मंजुरी दिली. त्यानंतर साखर आयुक्तांनीही परवानगी दिली होती. त्यानुसार सोमवारी ई-निविदा प्रक्रियेत सिद्धी शुगर उजना (ता. अहमदपूर, जि. लातूर), जकराया शुगर वरवाडे (ता. मोर, जि. सोलापूर), बारामती ॲग्रो (बारामती, जि. पुणे), धाराशिव साखर कारखाना चोराखडी (जि. उस्मानाबाद) यांनी निविदा भरली.

यात १०८, ११०, ११५ रुपये प्रतिटन टॅगिंग भरण्यात आले होते. बारामती ॲग्रोने ११५ रुपये प्रतिटन टॅगिंगनुसार व ५० लाख रुपये प्रतिवर्ष भाडेतत्त्वावर १५ वर्षांसाठी कारखाना घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे अखेर ‘चोसाका’ला बारामती ॲग्रोने नवसंजीवनी दिली. 

काटेरी मुकुट डोक्यावरून खाली 

चोसाकाची चाके गतिमान होतील की नाही, याबाबत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, कामगार यांच्यात शंका होत्या. हेवेदावे, राजकारण यामुळे चोसाकाची वाताहत झाली होती. कुणीच कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यास तयार होत नव्हते. अखेर उपाध्यक्ष देवरे, संचालक मंडळ, कामगारांच्या प्रयत्नांनी काटेरी मुकुट झेलत, डोक्यावरील ओझे पेलून ‘चोसाका’चा भाडेतत्त्वाचा डोंगर पार पाडला, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com