Agriculture news in marathi, Finally to ‘Chosaka’ Received revival | Page 3 ||| Agrowon

अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

चोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत ३ सप्टेंबरला पुणे साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यानुसार ई-निविदा प्रक्रिया सुरू होती.

चोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत ३ सप्टेंबरला पुणे साखर आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यानुसार ई-निविदा प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचच्या सुमारास पुणे येथे साखर आयुक्तालयात निविदा उघडण्यात आली. या प्रक्रियेत चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचे ११५ रुपये प्रतिटन टॅगिंगप्रमाणे सर्वांत उंच ई-टेंडर बारामती ॲग्रोने घेतले. त्यामुळे अखेर ‘चोसाका’ला संजीवनी मिळाली’’, अशी माहिती ‘चोसाका’चे अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी दिली. 

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत शेतकऱ्यांसह कामगारांची सर्वसाधारण सभा १३ ऑगस्ट २०१९ ला होऊन सर्व कामगार व शेतकरी यांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्यानुसार मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यात लक्ष घालून मंजुरी दिली. त्यानंतर साखर आयुक्तांनीही परवानगी दिली होती. त्यानुसार सोमवारी ई-निविदा प्रक्रियेत सिद्धी शुगर उजना (ता. अहमदपूर, जि. लातूर), जकराया शुगर वरवाडे (ता. मोर, जि. सोलापूर), बारामती ॲग्रो (बारामती, जि. पुणे), धाराशिव साखर कारखाना चोराखडी (जि. उस्मानाबाद) यांनी निविदा भरली.

यात १०८, ११०, ११५ रुपये प्रतिटन टॅगिंग भरण्यात आले होते. बारामती ॲग्रोने ११५ रुपये प्रतिटन टॅगिंगनुसार व ५० लाख रुपये प्रतिवर्ष भाडेतत्त्वावर १५ वर्षांसाठी कारखाना घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे अखेर ‘चोसाका’ला बारामती ॲग्रोने नवसंजीवनी दिली. 

काटेरी मुकुट डोक्यावरून खाली 

चोसाकाची चाके गतिमान होतील की नाही, याबाबत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, कामगार यांच्यात शंका होत्या. हेवेदावे, राजकारण यामुळे चोसाकाची वाताहत झाली होती. कुणीच कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यास तयार होत नव्हते. अखेर उपाध्यक्ष देवरे, संचालक मंडळ, कामगारांच्या प्रयत्नांनी काटेरी मुकुट झेलत, डोक्यावरील ओझे पेलून ‘चोसाका’चा भाडेतत्त्वाचा डोंगर पार पाडला, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. 
 


इतर बातम्या
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
मालेगाव बाजार समितीत बेकायदा अडत वसुली...नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक अखेर...सिंधुदुर्गनगरी ः कोरोनाचा प्रादुर्भाव आणि...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
जळगाव जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांने...जळगाव : जळगाव जिल्ह्यात यावर्षी पंधरा तालुक्यातील...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...