Agriculture news in marathi; Finally the Bagaji Sea 'Over Flow' | Agrowon

अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या तालुक्यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ३ सेमीने उघडण्यात आले. यातून ९० घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विशेष म्हणजे या धरणावरून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करी डेपोला पाणीपुरवठा करण्यात येतो. शनिवारी (ता. २१) रात्रीच्या वेळी या धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सुंदर देखावा दिसत होता. तर, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे.     

धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या तालुक्यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ३ सेमीने उघडण्यात आले. यातून ९० घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विशेष म्हणजे या धरणावरून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करी डेपोला पाणीपुरवठा करण्यात येतो. शनिवारी (ता. २१) रात्रीच्या वेळी या धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सुंदर देखावा दिसत होता. तर, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे.     

ऊर्ध्व वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्यात आल्याने  निम्न धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. आता बगाजी सागर धरण पूर्ण भरल्याने पावसाळ्याच्या  शेवटी  भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धामणगाव शहरासह परिसरातील गावाला बगाजी सागर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणाची पाणी साठवण क्षमता २८३.८० दलघमी आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात पाणी आले अथवा पाऊस झाला, की धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. आता पावसाने निम्न वर्धा धरण १०० टक्के भरले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र धामणगावकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाही, तर यावर्षीही पावसाळ्याच्या शेवटी निम्न वर्धा धरण १०० टक्के भरल्याने नागरिकांची चिंता मिटली आहे. 

धामणगावची  भागणार तहान
निम्न वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जॅकवेलद्वारे पिंपळखुटा गावाजवळील नदीपात्रातून धामणगाव शहराला पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात व दुष्काळी परिस्थिती असतानाही निम्न वर्धा धरणामुळे तहान भागविली गेली. या वर्षी सप्टेंबरमध्ये धरण १०० टक्के भरल्याने नागरिकांची वर्षभर तहान भागविली जाणार आहे.

पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी लोकांची गर्दी
बगाजी सागर धरणाच्या ३१ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी शनिवारी (ता. २१) लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी पाण्याचा विसर्ग कॅमेऱ्यात कैद केला, तर काहींना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...