बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे प्रशासकीय मंडळ

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी (ता. ७) प्रशासक मंडळाची नेमणूक झाली. पाच सदस्यीय मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नेमणूक करण्यात आली.
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे प्रशासकीय मंडळ Finally at Beed District Bank An administrative board of five
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे प्रशासकीय मंडळ Finally at Beed District Bank An administrative board of five

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी (ता. ७) प्रशासक मंडळाची नेमणूक झाली. पाच सदस्यीय मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नेमणूक करण्यात आली. प्रशासक मंडळाने बुधवारी उशिरा पदभारही स्वीकारला आहे.

प्रशासकीय मंडळामध्ये पाठक यांच्यासह शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे, सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि अॅड. अशोक कवडे यांचा समावेश आहे. लातूर येथील विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी या बाबतचे आदेश काढले. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र, सेवा सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठीचे सर्वच उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने उर्वरित सात मतदारसंघातील आठ जागांसाठी निवडणूक झाली. २० मार्चला मतदानानंतर २१ मार्चला मतमोजणी झाली. यामध्ये कल्याण आखाडे, भाऊसाहेब नाटकर, राजकिशोर मोदी, अमोल आंधळे, रवींद्र दळवी, सूर्यभान मुंडे, सुशीला पवार, कल्पना शेळके यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोरम पूर्ण होण्यासाठी किमान १३ संचालकांची गरज होती. मात्र, आठच संचालक असल्याने कोरम पूर्ण होत नसल्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहकार प्राधिकरणाला कळविला. त्यामुळे प्रशासक मंडळाची नेमणूक होणार हे निश्चितच होते. त्यानुसार अखेर बुधवारी वरील पाच जणांच्या प्रशासक मंडळाची नेमणूक झाली.

बँकेला २१ कोटी ५८ लाखांचा नफा बँकेला सरत्या वर्षात २१ कोटी ५८ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती मावळते अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली. बँकेच्या ठेवी ४४२ कोटी रुपये असून, १०५९ कोटींचे कर्ज आहे. भाग भांडवल ६५ कोटी ७५ लाख असून, राखीव निधी ४५९ कोटी ३२ लाख आहे. यंदा बँकेने १८९ कोटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केल्याचेही आदित्य सारडा यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com