Agriculture news in Marathi Finally, a case was filed against IFFCO Tokyo | Agrowon

अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय येथे कार्यान्वित नसल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात निदर्शनास आले. त्यामुळे या कराराचा भंग झाला असून, कंपनीविरुद्ध जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय येथे कार्यान्वित नसल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात निदर्शनास आले. त्यामुळे या कराराचा भंग झाला असून, कंपनीविरुद्ध जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नाही व कंपनीचे प्रतिनिधी उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार कृषिमंत्री दादा भुसे यांना अमरावती दौऱ्यात प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी या कंपनीच्या कार्यालयाची प्रत्यक्ष तपासणी केली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. कंपनीचे कार्यालय सुस्थितीत कार्यान्वित न झाल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे या कंपनीने खरीप व रब्बी हंगामासाठी शासनासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, याबाबत तक्रार दाखल करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पीकविमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ६५५ शेतकरी सहभागी आहेत. या कंपनीने तत्काळ जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी तत्काळ नेमून नुकसानग्रस्तांना पीक विमा मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. पीकविमा योजनेत सहभागी शेतकरी बांधवांनी नुकसान झाल्यास ७२ तासांच्या माहिती कंपनीला माहिती द्यावी. संपर्कात अडथळे येत असतील तसे कृषी कार्यालय, तहसील कार्यालयाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
 


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...