agriculture news in Marathi, finally horticulture crop insurance scheme announced, Maharashtra | Agrowon

हवामान आधारित फळपीक विम्याची अखेर घोषणा; आंबिया बहारासाठी संरक्षण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पुणे: प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठीच्या हवामान आधारित फळपीक विमा योजना २०१९ला आंबिया बहरामध्ये राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या सात फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये चार समूहांत योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

पुणे: प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठीच्या हवामान आधारित फळपीक विमा योजना २०१९ला आंबिया बहरामध्ये राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या सात फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये चार समूहांत योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

पाऊस, तापमान, आर्द्रता, गारपीट आणि वेगाचे वारे आदी हवामानाच्या धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण या सात फळपिकांना मिळणार आहे. योजनेत कुळाने, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विविध वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असतील अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून, बिगर कर्जदारांना ऐच्छिक असणार आहे.

हवामान आधारित फळपीक विमा योजना २०११-१२ राज्यात सुरू झाली. त्यानंतर २०१६ च्या मृग बहरापासून समूह (क्लस्टर) पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यात मृग बहरासाठी पाच व आंबिया बहरासाठी चार समूह तयार करण्यात आले आहेत. 

यंदा एकच कंपनी
गेल्या वर्षी योजनेसाठी न्यू इंडिया एश्योरन्स 
कंपनी आणि कृषी विमा कंपनी यांचा सहभाग होता. 
यंदा मात्र, फक्त भारतीय कृषी विमा कंपनी लि. राज्यात फळपीक विमा राबविणार आहे. टोल फ्री. नंबर : १८००१०३००६१ 

ऑनलाइन अर्ज
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन 
सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक आहे. तसेच समवेत ७/१२, आधार कार्ड, बँक खाते तपशील लागणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे. 

असे आहेत जिल्हा समूह 
समूह १ :
 सोलापूर, नगर, जालना, पुणे, पालघर, सातारा, नांदेड, नागपूर, यवतमाळ 
समूह २: सांगली, औरंगाबाद, धुळे, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नंदुरबार 
समूह ३: जळगाव, बुलडाणा, लातूर, रायगड, उस्मानाबाद, रत्नागिरी, परभणी
समूह ४:  बीड, ठाणे, नाशिक, वर्धा, वाशीम, हिंगोली.

असा असेल विमा हप्ता (हेक्टरी) 

अ.क्र. पिकांचे नाव  नियमित  गारपीट  एकूण विमा हप्ता 
1 द्राक्ष १५ हजार ४००  ५ हजार १३३   २० हजार ५३३ 
2 केळी ६ हजार ६०० २ हजार २००  ८ हजार ८००    
3 आंबा  ६ हजार ५० २ हजार १७   ८ हजार ६७ 
4  डाळिंब   ६ हजार ५०   २ हजार १७  ८ हजार ६७ 
5 काजू ४ हजार २५०  १ हजार ४१७   ५ हजार ६६७ 
6 संत्रा ३ हजार ८५० १ हजार २८३   ५ हजार १३३ 
7 मोसंबी     ३ हजार ८५० १ हजार २८३   ५ हजार १३३ 

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा काढण्याची अंतिम मुदत

  • द्राक्ष, मोसंबी, केळी  :७ नोव्हेंबर 
  • संत्रा, काजू, आंबा (कोकण) : ३० नोव्हेंबर 
  • आंबा (इतर जिल्हे) : ३१ डिसेंबर 
  • डाळिंब : १४ जानेवारी २०२०

इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...