Agriculture news in Marathi, Finally ordered poultry closure due to bad odor | Agrowon

गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा आदेश !

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर लोकांकडून होणारा विरोध लक्षात घेत कंबलपेठा येथील पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर लोकांकडून होणारा विरोध लक्षात घेत कंबलपेठा येथील पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिरोंचा तालुक्‍यातील कंबलपेठा गावाजवळ अंकिसा येथील रहिवासी व्यंकटेश्‍वर येनगंट यांनी कुक्‍कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. गावालगतच्या एका शेतात त्याकरिता मोठ्या शेडची उभारणी करण्यात आली. त्याकरिता नाहरकत प्रमाणपत्रही मिळविण्यात आले; परंतु या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत होती. 

दुर्गंधीमुळे १५ दिवसांपूर्वी गावातील २१ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती बिघडली. त्याकरिता गावातच आरोग्य शिबिर घेण्याची वेळ आल होती. त्यामुळे हा कुक्‍कटपालन व्यवसाय बंद करावा, अशी मागणी कंबलपेठा ग्रामस्थांकडून होत होती. 

अधिकाऱ्यांना या विषयावर निवेदनही देण्यात आले. गावकऱ्यांचा पोल्ट्रीला वाढता विरोध पाहता अहेरीचे उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी (ता. १२) कंबलपेठा येथे जात परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी गावात प्रवेश करताच त्यांनाही दुर्गंधी असह्य झाली होती. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांनी पोल्ट्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...