संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
...अखेर जायकवाडीतून रब्बी सिंचनासाठी पाणी सोडले
औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पावरून कालव्याद्वारे केल्या जाणाऱ्या सिंचनासाठी बुधवारी (ता. ११) सायंकाळी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. येत्या १५ डिसेंबरपासून रब्बीसाठी निर्धारित तीन आवर्तनांच्या पहिल्या पाणी पाळीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी कमी क्षमतेने सोडल्या जाणाऱ्या पाण्यातून टेलपर्यंत पाणी पोचण्यात कोणता अडथळा तर नाही ना, याची चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

तुडुंब असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून अखेर रब्बीसाठी तीन पाणी आवर्तनांचे नियोजन जलसंपदा विभागाच्या जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान ही आवर्तने सोडली जातील. दोन आवर्तनांमध्ये साधारणत: आठवड्याचे अंतर असेल. औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात डाव्या कालव्याद्वारे, तर उजव्या कालव्यातून औरंगाबाद व बीड जिल्ह्यात पाणी मिळेल. २०८ किलोमीटर अंतराचा डावा व १३२ किलोमीटर अंतराचा उजवा कालवा, या दोन्ही कालव्यांद्वारे नियोजनानुसार पाणी सोडण्याचे नियोजन आहे. गाळ काढणे, गवत काढणे, दरवाजांची दुरुस्ती, मुख्य कालव्यात खचलेला भराव बाजूला करणे आदी कामे करण्यात आल्याचे व काही सुरू आहेत.
कालव्याच्या निर्मितीला चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. बहुतांश ठिकाणी कालव्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परंतु रब्बी सिंचनासाठी पाणी सोडण्याला आधीच विलंब झाला आहे. आता पाणी सोडण्याशिवाय पाटबंधारे विभागाकडे पर्याय नाही. त्यामुळे नियोजनानुसार जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून बुधवारी (ता. ११) सायंकाळी ३०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले.
टेलपर्यंत पाणी पोचण्यात कोणताही अडथळा आला नाही, तर मागणीनुसार पाण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढविले जाणार आहे.
औरंगाबाद विभागांतर्गत १२२ किलोमीटरपर्यंत पाणी पोचल्यानंतर पाण्याचे प्रमाण वाढविले जाणार आहेत.,अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
- 1 of 1029
- ››