agriculture news in Marathi finally responsibility devided from POCRA Maharashtra | Agrowon

‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

अकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी सहायकांनी विविध मागण्यांसाठी सातत्याने केलेल्या लढ्याला अंशतः यश आले असून आता कामाच्या जबाबदारीचे विभाजन करण्यात आले आहे. आजवर या प्रकल्पात समावेश नसलेल्या कृषी खात्याच्या इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

अकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी सहायकांनी विविध मागण्यांसाठी सातत्याने केलेल्या लढ्याला अंशतः यश आले असून आता कामाच्या जबाबदारीचे विभाजन करण्यात आले आहे. आजवर या प्रकल्पात समावेश नसलेल्या कृषी खात्याच्या इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यांत पोकरा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या योजना गाव पातळीवर राबविण्याचा मोठा भार कृषी सहायकाच्या खांद्यावर आहे. कृषी खात्याशिवाय इतर विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीची तसेच आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी कृषी सहायकावर दिल्याने याला सुरुवातीपासूनच विरोध झाला.

१२ डिसेंबरपासून कृषी सहायकांनी महिनाभर बहिष्कार आंदोलन केले. मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे तेव्हा आश्‍वासन मिळाल्याने कृषी सहायकांनी आंदोलन मागे घेतले. या मागण्यांबाबत मध्यंतरी नागूपर येथे कृषी खात्याच्या सचिवांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर आता जबाबदाऱ्यांचे विभाजन करण्यात आल्याचे सविस्तर पत्र पोकराच्या संचालकांकडून काढण्यात आले आहे. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार घटकांची अंमलबजावणी करताना स्थळ पाहणी, पूर्व संमती, मोका तपासणी यांची तपासणी समूह सहायक, कृषी सहायक व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. याबाबत क्षेत्रीय स्तरावर झालेल्या बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांनी कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आता स्थळ पाहणी (टप्पा -२), पूर्व संमती (टप्पा ३) आणि मोका तपासणी (टप्पा ४) या टप्प्यांची जबाबदारी विभागणीस शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. घटकनिहाय स्थळपाहणी, पूर्व संमती व मोका तपासणीची जबाबदारी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

इतर विभागाच्या योजनातून मुक्त करा
कृषी सहायकांनी केलेल्या लढ्यानंतर पोकरा प्रकल्पाने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांचा यात समावेश केला. अजूनही शेळी, रेशीम पालन व इतर विभागाच्या योजनांबाबत स्पष्टपणे जबाबदारी विभागण्यात आलेली दिसत नाही. सोबतच कृषी सहायकांकडे असलेली आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी कायम असल्याचे सध्या दिसून येते. याबाबत प्रशासनाने तातडीने सुधारणा करीत कृषी सहायकांना यातून मुक्त करण्याची मागणी कृषी सहायकांकडून कायम ठेवण्यात आलेली आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...