agriculture news in marathi Finally the water of ‘Mhaisal’ share to Mangalvedha | Agrowon

मंगळवेढ्याच्या वाट्याला अखेर ‘म्हैसाळ’चे पाणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

सोलापूर ः मंगळवेढ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या म्हैसाळ योजनेचे पाणी पहिल्यांदाच मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या कालव्याद्वारे मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पाण्याचा नऊ गावांतील ३८६० हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. 

सोलापूर ः मंगळवेढ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या म्हैसाळ योजनेचे पाणी पहिल्यांदाच मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या कालव्याद्वारे मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पाण्याचा नऊ गावांतील ३८६० हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. 

गेल्या २१ वर्षांपासून या पाण्यासाठी मंगळवेढावासिय प्रतीक्षा करत होते. या योजनेच्या नियोजित सहाव्या टप्प्यातून हे पाणी मंगळवेढ्यातील सहा हजार हेक्टर शेतीला मिळणार होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी या पाण्यापासून मंगळवेढेकर अद्यापही वंचित होते. पण, दोन वर्षापूर्वी पंतप्रधान सिंचन योजनेतून या योजनेसाठी जवळपास २ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे योजनेचा मार्ग मोकळा झाला. 

कृष्णेच्या पुरामुळे सांगलीला पूरस्थिती निर्माण होऊ नये, या साठी अतिरिक्त पाणी वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या उद्देशाने या योजनेतून आधी शिरनांदगी तलाव भरून देण्यात आला. आता या वितरिकेचे काम पूर्ण झाले. त्यामुळे हे पाणी सध्या कालव्यात सोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील महमदाबाद, मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खु, सलगर बु, पौट, वावची या गावांना फायदा होईल. या भागातील ३८६० हेक्टर शेतीला त्याचा लाभ होणार आहे.

नेत्यांकडून श्रेयवादाचे राजकारण 

म्हैसाळ योजनेच्या या पाण्याचे पूजन आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे  पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून या योजनेला निधी मिळाला. त्यामुळे योजना पूर्णत्वास गेली, असे आवताडे म्हणाले.

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनीही या पाण्याचे पूजन केले. तत्कालीन आमदार भारत भालके यांच्या प्रयत्नाने हा निधी मिळाला, असे त्यांनी सांगितले. 


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...