धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाही. हे थकीत १४२ कोटी आणि बोनसचे २०० कोटी, अशी रक्कमशेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी Financial dilemma of farmers due to non-payment of paddy
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी Financial dilemma of farmers due to non-payment of paddy

गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे मिळाले नाही. हे थकीत १४२ कोटी आणि बोनसचे २०० कोटी, अशी रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे.

कोरोनामुळे सर्वदूर सामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. हंगामातील शेतमाल विक्री नंतर त्यांच्याकडे पैसा येतो. त्याच पैशाचा उपयोग करून देणगीदारांची देणी चुकवली जातात. वर्षभरातील कौटुंबिक गरजांसाठी लागणाऱ्या पैशाचे नियोजन देखील याच माध्यमातून होते.

परंतु गेल्या हंगामातील धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही चुकारे देण्यात आले नाही. तब्बल १४२ कोटी रुपये शेतमाल विक्रीचे तर २०० कोटी रुपये बोनसचे आहेत. ही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने बोनस आणि चुकारे रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. 

जिल्ह्यात येत्या काही दिवसांत रब्बी धान पिकाचे कापणीला सुरुवात होईल. त्यानंतर शेतकरी धान खरेदी केंद्रावर विकण्यासाठी गर्दी करतील. मात्र यंदा खरिपातील धानाचे मिलिंगच झाले नाही.  परिणामी गोदाम फूल आहेत यामुळे शेतकरी शासकीय धान खरेदी बाबत साशंक आहेत. शेतकऱ्यांच्या मनातील अस्वस्थता दूर करीत शासनाने मिलिंगचा निर्णय घ्यावा. त्यानंतर एक मेपासून नव्याने धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी देखील विनोद अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना शासकीय धान्य विक्री करताना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. गोंदिया शहरालगत असलेल्या गावातील शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन नसल्याने धान विक्रीत त्यांना अनेक अडचणी आल्या. या वर्षी देखील तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता प्रशासनाने आधीच नियोजन करावे, अशी सूचना देखील आमदार अग्रवाल यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com