समृद्धीसाठी आर्थिक शिस्त आवश्यक ः निंबाळकर

उस्मानाबाद ः ‘‘शेतकऱ्यांनी समृद्ध होण्यासाठी आर्थिक शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कर्जांची वेळेवर परतफेड करून आपले रेकॉर्ड चांगले ठेवले पाहिजे. हीच शिस्त पाळल्याने बॅंका मोठे कर्ज देतात. कर्जाद्वारे शेतकरी समृध्द होऊ शकतात,’’ असे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.
Financial discipline for prosperity Required: Nimbalkar

उस्मानाबाद येथील परिमल मंगल कार्यालय येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, महिला बचतगट यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती दत्ता साळुंखे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थंकर आदी उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले,‘‘शेतकऱ्यांनी पीक कर्जाबाबतही लक्ष देण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना नुकसान झाल्याची कल्पना दिली नव्हती. म्हणून त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने विमा कंपन्यांना पिकांच्या नुकसानाची कल्पना देऊन त्याचे पंचनामे करून घेणे आवश्यक असते. आताचा काळ कृषिमाल प्रक्रिया, मार्केटिंगचा आहे. यासाठी शासनाच्या योजना आहेत. बदलत्या काळात शेतकऱ्यांनीसुद्धा बदलण्याची गरज आहे.’’  

राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, शेती व शेतीपूरक व्यवसाय आदी विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com