बचत गटांमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ः राजश्री घुले

Financial empowerment of women due to savings groups: Rajashree Ghule
Financial empowerment of women due to savings groups: Rajashree Ghule

नगर : महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट महत्त्वाचे साधन असून, या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यास महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी व्यक्त केले.  

नगरमध्ये तांबटकर मळ्यात ११ व्या साईज्योती स्वयंसाह्यता बचत गटाचे प्रदर्शन होत आहे. अध्यक्षा घुले यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, आमदार आशुतोष काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परीक्षित यादव, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. 

घुले म्हणाल्या, की नगर जिल्ह्याला अकरा वेळा बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली आहे. सहा वेळेस जिल्हा स्तरावर, तर पाच वेळेस विभागीय प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले. या सर्व प्रदर्शनांना नगरकरांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याचा आपला कायम प्रयत्न असतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विशेष प्रयत्नातून महिलांना राजकीय आरक्षण मिळाल्याने आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सक्षमपणे विविध पदे भूषवून ठसा उमटविणारे काम करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com