अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक मदत

अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक मदत
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक मदत

गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्‌ग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. आरमोरी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शासन धोरणानुसार धनादेशाचे वितरण केले गेले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कल्याणकुमार डहाट होते. या वेळी आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, स्वच्छता व आरोग्य सभापती भारत बावनथडे, नायब तहसीलदार वाय. टी. चापळे उपस्थित होते. 

देशपूर येथील कौशल्या लोमेश उंदीरवाडे यांचे पती पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना चार लाख रुपयांचा धनादेश वितरित केला. किटाळी येथील सुकरू लक्ष्मण मानकर यांच्या बैल व गायीची जीवितहानी झाल्याबद्दल मदतीपोटी त्यांना ३५ हजार रुपयांचा धनादेश दिला गेला. आरमोरी तालुक्‍यात एकूण ७४८ घरांची पडझड झाली तर सात घरांची पूर्णतः पडझड झाली. 

तालुक्‍यातील जनावरांच्या ५० गोठ्यांचे नुकसान झाले. त्याबद्दल देखील मदतराशी वितरित करण्यात आली. अतिवृष्टीमुळे जवळपास ७५० घरांची पडझड झाली आहे. एका महिन्यात सर्व नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामे तलाठी व ग्रामसेवकांमार्फत पूर्ण करून मदतनिधी दिला जाईल, असे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी या वेळी सांगितले. गौरीशंकर ढगे यांनी आभार मानले. या वेळी आरमोरी तालुक्‍यातील तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com