Agriculture news in marathi Financial support for wildlife attacks | Agrowon

वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास मिळणार मदत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अकोला  ः राज्यात वन्यजीवांचे हल्ले सातत्याने वाढलेले आहेत. अशा हल्ल्यांच्या मदतीमध्ये रोही (नीलगाय) व माकड या वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा आजवर समावेश नव्हता. मात्र, शासनाने आता याबाबतच्या धोरणात सुधारणा करीत रोही व माकडाच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू, अपंगत्व किंवा जखमी झाल्यास अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रामुख्याने होणार आहे.

अकोला  ः राज्यात वन्यजीवांचे हल्ले सातत्याने वाढलेले आहेत. अशा हल्ल्यांच्या मदतीमध्ये रोही (नीलगाय) व माकड या वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा आजवर समावेश नव्हता. मात्र, शासनाने आता याबाबतच्या धोरणात सुधारणा करीत रोही व माकडाच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू, अपंगत्व किंवा जखमी झाल्यास अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रामुख्याने होणार आहे.

आजवर राज्यात वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर व रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत किंवा जखमी झाल्यास संबंधितांना अर्थसाह्य दिले जाते. शिवाय गाय, बैल, म्हैस, बकरी, मेंढी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास जखमी झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद केलेली आहे. याबाबतचे निकष व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर काही रोख व काही मदत बँक खात्यात ठेव, अशा प्रकारे दिली जाते.  

या यादीत रोही (नीलगाय) व माकडाचा समावेश नव्हता. वास्तविक, या दोन वन्यजीवांचा वावर हा इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. रोही, माकडांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. नुकसान होऊनसुद्धा आजवर कुठलीही मदत देण्याची तरतूद कायद्यात नव्हती. शेतकऱ्यांकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. अखेर शासनाने बुधवारी (ता. १२) घेतलेल्या निर्णयानुसार आता रोही व माकडाच्या हल्ल्यात मनुष्य मृत, अपंग, गंभीर किंवा किरकोळ जखमी झाल्यास यापूर्वी इतर वन्यजीवांबाबत जे धोरण ठरविण्यात आले, त्यानुसार मदत मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

गेल्या काही वर्षांत रोही व माकडांची संख्या कमालीची तर वाढलीच; शिवाय या दोन्ही वन्यजीवांचा गावशिवारातील वावरही अधिक आहे. रोहींचे जथ्थे खरीप, रब्बी हंगामात पीक उगवणीला आले की नष्ट करीत असल्याच्या घटना या भागात अनेकदा घडल्या. तर, माकडांकडून हल्ले होण्याचे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत. शासनाच्या मदत यादीत या दोन वन्यजीवांचा समावेश झाल्याने आपद्ग्रस्तांना दिलासा मिळू शकेल. यापूर्वी नीलगाय, माकडामुळे होणाऱ्या नुकसानाची केवळ शेतीची भरपाई देण्याची तरतूद होती. 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...