पुणे विभागात हिरवा चारा मिळेना

पुणे विभागात हिरवा चारा मिळेना
पुणे विभागात हिरवा चारा मिळेना

पुणे ः पाणीटंचाईमुळे पुणे विभागात चारा पिकांची कमी क्षेत्रावर पेरणी झाली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून चाराटंचाई भीषण स्वरुप धारण करीत आहे. उन्हाळ्यात जनांवरासाठी चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हिरवा चाराही महाग झाला असून तो मिळेनासा झाला आहे. नगर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. तर सोलापूर, पुणे या भागांतूनही चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे.   

रब्बी हंगामात अवघ्या ९१ हजार २१० हेक्टरवर चारा पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात याच कालावधीत एक लाखाहून अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा जवळपास नऊ हजारहून अधिक हेक्टरने घट झाली आहे. दरवर्षी पुणे विभागात एक लाखाहून अधिक क्षेत्रावर मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड होत होती. चालू वर्षी कमी झालेल्या लागवडीमुळे उत्पादनात घट झाली असून, चाराटंचाईमुळे शेतकरी जनावरे विकू लागल्याचे चित्र आहे.

नगर जिल्ह्यात ३७ हजार ८३० हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यांत बऱ्यापैकी चारा पिकांची लागवड झाली आहे. मात्र, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, अकोले तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात चाराटंचाई भेडसावू लागली आहे. जनावरांसाठी छावण्या उभा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातही अवघ्या ३० हजार ९७० हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत अल्प क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, पुरंदर तालुक्यांत अवघ्या बोटावर मोजण्याएवढ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात अवघ्या २२ हजार ४१० हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे.

रब्बी हंगामात चारा पीकनिहाय झालेली लागवड हेक्टरमध्ये  
मका ३२८३०
कडवळ २०१३०
बाजरी ७९०
लुसर्नग्रास १२२१०
नेपिअर ३२००
इतर चारा पिके  २२०४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com