Agriculture News in Marathi Find out for yourself now Who bought the factory? | Agrowon

आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी विकत घेतला : अजित पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर कारखाने विकले किंवा चालवायला दिले. त्यातील काही कारखाने फडणवीस सरकारच्या काळात देखील विकण्यात आले. दोन-चार कोटी रुपयांना देखील कारखान्यांची विक्री झाली आहे.

पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर कारखाने विकले किंवा चालवायला दिले. त्यातील काही कारखाने फडणवीस सरकारच्या काळात देखील विकण्यात आले. दोन-चार कोटी रुपयांना देखील कारखान्यांची विक्री झाली आहे. या सर्व कारखान्यांची यादी मी तुम्हाला दिली आहे. कारखाने कुणी कुणी किती किमतीला घेतले त्याचा शोध आता तुम्हीच घ्या, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शुक्रवारी (ता.२२) पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. 

अजित पवार यांनी ६५ कारखान्यांची यादीच वाचून दाखवत कोणता कारखाना किती रकमेला विकला गेला, ती आकडेवारी वाचून दाखविली. पवार म्हणाले, ‘‘जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची विक्री ही पूर्णपणे कायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य बँकेने त्या कारखान्याची विक्री केली आहे. यात कोणताही घोटाळा किंवा नियमबाह्य काहीही झालेले नाही. केवळ बदनामी करण्यात येत आहे. जरंडेश्‍वरच्या व्यवहारात कोणताही गैरप्रकार झाला नाही. सारेकाही नियमानुसार झाले असताना केवळ बदनामी करण्यात येत आहे. सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच.’’ 

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये 
पवार यांनी ६५ कारखान्यांची यादी वाचून दाखवताना कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही. ज्या कंपनीने संबंधित कारखाना विकत घेतला आहे, त्या कंपनीची नावे वाचून दाखविली. या कंपन्यांच्या नावावरून तुम्हाला मालकांचा शोध लागेल, असेही ते म्हणाले. ज्यांनी आरोप करून बदनामी केली, त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. त्यांच्या विरोधात न्यायालयातही जाणार नाही. असले उद्योग मी करीत नाही. मला भरपूर कामे आहेत. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे आपल्याला लहानपणी शिकवले जाते, याचीही आठवण त्यांनी करून दिली, पवार यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांचा नामोल्लेख आवर्जून टाळला. 

हे येरागबाळ्याचे काम नाही 
सोमय्या यांचे नाव न घेता पवार म्हणाले, ‘‘काही लोकांना उद्योग नसल्याने ते चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यासाठी त्यांनी सीए आणि वकील नेमले आहेत. त्यांचे इकडून आणि तिकडून दौरा सुरू आहेत. प्रत्यक्षात त्यांना हाती काही लागत नाही. ते पुणे जिल्हा बॅंकेत गेले. ती बॅंक तर व्यवस्थित सुरू आहे. पारनेर कारखान्यावर ते जाऊन आले. त्याचे पुढे काय झाले? आणखी दहा कारखान्यांचे टेंडर निघाले. ते भरा. ते भरायला कोणी मनाई केली आहे का? कारखाने चालवणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही.’’


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...